आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 ऑक्टोबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 ऑक्टोबर 2022

पंचांग

साेमवार : अश्विन ११, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय पहाटे ३-१८, चंद्रास्त सायं. ४-३२, सूर्योदय ६-३१, सूर्यास्त सायं. ६-२४, भानुसप्तमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), त्रिरात्रोत्सव, सरस्वती आवाहन, जैन आयंबील ओळी प्रारंभ, भारतीय सौर आश्‍विन १० शके १९४४.

दिनविशेष

२००५ : जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राच्या १७ मिनिटांच्या तीन चाचण्या.

२००५ : पोटातील ‘अल्सर’वरील प्रभावी उपचार शोधून काढल्याबद्दल ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञ बॅरी जे. मार्शल आणि जे. रॉबिन वॉरेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर.

२०१२ : ६६व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेने उत्कृष्ट कामगिरी करत १०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.

२०१४ : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाने आपापल्या गटातील इराणच्याच संघांना पराभूत करून सुवर्णपदक पटकाविले.

२०१५ : अग्रमानांकित सानिया मिर्झा-मार्टिना हिंगीस या जोडीने वुहान ओपन टेनिस स्पर्धा जिंकून मोसमातील सातवे विजेतेपद पटकावले.

टॅग्स :culturePanchangHistory