
पंचांग - शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध ११, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय दुपारी २.४२, चंद्रास्त पहाटे ३.१९, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ५.५५, मोक्षदा स्मार्त एकादशी, गीता जयंती, मौनी एकादशी - जैन, भारतीय सौर मार्गशीर्ष १२ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 डिसेंबर 2022
पंचांग -
शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध ११, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय दुपारी २.४२, चंद्रास्त पहाटे ३.१९, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ५.५५, मोक्षदा स्मार्त एकादशी, गीता जयंती, मौनी एकादशी - जैन, भारतीय सौर मार्गशीर्ष १२ शके १९४४.
दिनविशेष -
२००४ - आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, सुब्रह्मण्यम भारती, शरच्चंद्र बोस, त्रिदीपकुमार चौधरी यांच्या तैलचित्रांचे अनावरण उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये समारंभपूर्वक झाले.
२००५ - जमिनीवरून आकाशात मारा करू शकणाऱ्या आकाश या लघुपल्ल्याच्या क्षेपणास्त्राची बालासोर येथील चंडीपूर येथील संरक्षण दलाच्या तळावर यशस्वी चाचणी.
२००९ - ऐतिहासिक ब्रेबॉर्न स्टेडिअमवर वीरेंद्र सेहवागने श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात चाळीस चौकार आणि सात षटकारांची बरसात करीत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दिवसभरात तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक वैयक्तिक धावा, दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत वेगवान द्विशतक, दिवसभरात नाबाद उच्चांकी धावसंख्या उभारून देण्याची कामगिरी, कसोटी कारकिर्दीतील सहा हजार धावांचा टप्पा पूर्ण, अशा अनेक संस्मरणीय कामगिरीने सेहवागने दिवस गाजविला.