
पंचांग - रविवार : फाल्गुन शुद्ध १३, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय सायंकाळी ५, चंद्रास्त सकाळी ६.१२, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ६.४०, भारतीय सौर फाल्गुन १४ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 मार्च 2023
पंचांग -
रविवार : फाल्गुन शुद्ध १३, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय सायंकाळी ५, चंद्रास्त सकाळी ६.१२, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ६.४०, भारतीय सौर फाल्गुन १४ शके १९४४.
दिनविशेष -
१९९७ - ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेलल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले.
१९९८ - नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणाऱ्या, रशियाकडून घेतलेल्या ‘सिंधुरक्षक’ या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन.
१९९९ - संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या ‘पिनाका’ या प्रक्षेपक यंत्रणेची ओडिशा येथील बालासोर येथे यशस्वी चाचणी.
२००० - कर्नाटकातील ‘कैगा’ अणुवीजप्रकल्प (युनिट-२) पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.