आजचे पंचांग, दिनविशेष आणि दिनमान - 07 जानेवारी 2022

पंचांग - शुक्रवार : पौष शुद्ध ५, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सकाळी १०.५९, चंद्रास्त रात्री १०.५९, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.११, भारतीय सौर पौष १७ शके १९४३.
Horoscope And Panchang
Horoscope And PanchangSakal
Summary

पंचांग - शुक्रवार : पौष शुद्ध ५, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सकाळी १०.५९, चंद्रास्त रात्री १०.५९, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.११, भारतीय सौर पौष १७ शके १९४३.

पंचांग -

शुक्रवार : पौष शुद्ध ५, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सकाळी १०.५९, चंद्रास्त रात्री १०.५९, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.११, भारतीय सौर पौष १७ शके १९४३.

दिनविशेष -

२००१ - खापरखेडा हा २१० मेगावॉटचा प्रकल्प औष्णिक विद्युत केंद्राकडून ४० महिन्यांत पूर्ण.

२००१ - भाताची जनुकीय साखळी समजून घेण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात भारत सहभागी. यामुळे भातामधील सर्व म्हणजे सुमारे पन्नास हजार जनुकांच्या साखळीचा अर्थ समजून पिकातील पोषणमूल्य घटकांची वाढ करणे आणि संभाव्य रोगांना आळा घालण्यास मदत.

२०१४ - भारतीय वंशाच्या खलील रझाक या शास्त्रज्ञाच्या संशोधनास तब्बल आठ लाख ६६ हजार ९०२ अमेरिकन डॉलरचा निधी घोषित करण्यात आला. वृद्धापकाळी येणाऱ्या बहिरेपणावर उपचारासंदर्भात त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी राष्ट्रीय विज्ञान प्रतिष्ठानकडून फॅकल्टी करिअर डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत हा निधी मंजूर.

दिनमान -

मेष : प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

वृषभ : नोकरीत उत्तम स्थिती राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.

मिथुन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वाहने जपून चालवावीत.

तूळ : काहींची वैचारिक प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृश्‍चिक : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कुंभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने सावकाश चालवावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com