Panchang 17 March : शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करा, दिवस शुभ जाणार l Panchang 17 March 2023 suryasiddhant deshpande | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

panchang

Panchang 17 March : शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करा, दिवस शुभ जाणार

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक १७ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन २६ शके १९४४

आज सूर्योदय ०६ : ४५ वाजता तर सूर्यास्त १८:४१ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही २८:०३ आहे. आज प्रात: संध्या ही स.०५:३३ ते स.०६:४५ दरम्यान होणार तर सायं संध्या ही  १८:४१ ते १९:५३ दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १३:५५ ते १६:१८दरम्यान होणार तर आज प्रदोषकाळ हा १८:४१ ते २१:०६ दरम्यान आहे. आज निशीथ काळ हा २४:१९ ते २५:०७ दरम्यान आहे तर राहु काळ हा ११:४१ ते १२:४३ दरम्यान आहे. आज यमघंट काळ हा १५:४२ ते १७:१२ दरम्यान आहे तर आज श्राद्धतिथी एकादशी श्राद्ध आहे.

सर्व कामांसाठी स.१०:३६ नं.शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५५ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी पडवळ खावू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

 • लाभ मुहूर्त-- ०८:१५ ते ०९:४४

 • अमृत मुहूर्त--  ०९:४४ ते ११:१४

 • विजय मुहूर्त— १४:४३ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास १०:३६ प. राहु मुखात आहुती आहे. शिववास १०:३६ नं.कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी १०:३६ नं. शुभ दिवस आहे.

 • शालिवाहन शके -१९४४

 • संवत्सर - शुभकृत्

 • अयन - उत्तरायण

 • ऋतु - वसंत(सौर)

 • मास - फाल्गुन

 • पक्ष - कृष्ण

 • तिथी - दशमी(१०:३६ प.नं.एकादशी)

 • वार - शुक्रवार

 • नक्षत्र - उत्तराषाढा(२३:५४ प.नं.श्रवण)

 • योग - परिघ(२५:०० प.नं. शिव)

 • करण - भद्रा(१०:३६ प.नं.बव)

 • चंद्र रास - धनु (०७:०८ नं.मकर)

 • सूर्य रास - मीन

 • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १०:३६ प., स्मार्त पापमोचनी एकादशी आहे. या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे. सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करावे. ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. कुलदेवीस खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस पांढरे वस्त्र दान करावे.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशींना स.०७:०८ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

टॅग्स :Panchang