Panchang 6th Oct. : गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा; दिवस शुभ जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang 6th Oct.

Panchang 6th Oct. : गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा; दिवस शुभ जाणार

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक ६ ॲाक्टोबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १४ शके १९४४

सूर्योदय ०६:३० वाजता तर सूर्यास्त १८:१६ वाजता आहे. चंद्रोदय रात्री १६:०८ वाजता आहे. प्रात: संध्या सकाळी ०५:१६ ते ०६:३० वाजेपर्यंत करावी. सायं संध्या १८:१६ ते १९:२९ या काळात करावी. अपराण्हकाळ १३:३४ ते १५:५५ दरम्यान असणार आहे. प्रदोषकाळ १८:१६ ते २०:४३दरम्यान असेल. निशीथ काळ २३:५९ ते २४:४७ वाजेपर्यंत आहे. तर, राहु काळ १३:५१ ते १५ : १९ दरम्यान असणार आहे. यमघंट काळ ०६:३० ते ०७:५८ आहे.

श्राद्धतिथी द्वादशी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी स.०८:४१ नं. शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१३ ते दु.०१:३२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी पावटे खावू नये. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १२:२३ ते १३:५१

  • अमृत मुहूर्त--  १३:५१ ते १५:१९

  • विजय मुहूर्त— १४:२० ते १५:०७

पृथ्वीवर अग्निवास नाही. शनि मुखात आहुती आहे. शिववास ०८:४० नं.कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी ०८:४० नं.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - शरद(सौर)

  • मास - आश्विन

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - एकादशी(०८:४० प.नं. द्वादशी)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - धनिष्ठा(१९:५२ प.नं. शततारका)

  • योग - शूल(२७:५९ प.नं.गंड)

  • करण - भद्रा(०८:४० प.नं. बव)

  • चंद्र रास - मकर (०८:३३ नं.कुंभ)

  • सूर्य रास - कन्या

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा ०८:४० पर्यंत पापांकुशा एकादशी (उपवास) आहे. पंचक प्रारंभ सकाळी ०८:३३ नंतर आहे.

या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे. नारायण हृदय व दत्त कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. विष्णूंना केळ्यांचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस पिवळे वस्त्र दान करावे.

दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशिंना स.०८:३३ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

टॅग्स :Panchang