Panchang 9 May : आज लाल वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

आज चंद्रोदयाची वेळी ही २२:५४ वाजता होणार तर प्रात: संध्याची वेळ ही स.०५:०० ते स.०६:०७ दरम्यान असणार
Panchang 9 May
Panchang 9 Mayesakal

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ९ मे २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १९ शके १९४५

आज सूर्योदय ०६:०७ वाजता तर सूर्यास्त १८:५३ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळी ही २२:५४ वाजता होणार तर प्रात: संध्याची वेळ ही स.०५:०० ते स.०६:०७ दरम्यान असणार. आज सायं संध्या ही १८:५३ ते २०:०१ दरम्यान असणार तर अपराण्हकाळ हा १३:४६ ते १६:२० दरम्यान असणार. आज प्रदोषकाळ हा १८:५३ ते २१:०९ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:०९ ते २४:५४ दरम्यान असणार. आज राहु काळ हा १५:४३ ते १७:१९ दरम्यान असणार तर यमघंट काळ हा ०९:१९ ते १०:५५ दरम्यान असणार.

आज श्राद्धतिथी ही चतुर्थी श्राद्धअसणार. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी मुळा खावू नये. या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे. 

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १०:५५ ते १२:३१

अमृत मुहूर्त-- १२:३१ ते १४:०७

विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास नाही. मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

Panchang 9 May
Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 मे 2023

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - वैशाख

पक्ष - कृष्ण

तिथी - चतुर्थी(१७:४८ प.नं. पंचमी)

वार - मंगळवार

नक्षत्र - मूळ(१९:१७ प.नं.पूर्वाषाढा)

योग - सिद्ध(२२:४१ प.नं. साध्य)

करण - बव(०६:५० प.नं.बालव)

चंद्र रास - धनु

सूर्य रास - मेष

गुरु रास - मेष (panchang)

Panchang 9 May
Sankashti Chaturthi 2023 : 'या' राशींसाठी संकष्टी चतुर्थी ठरणार लाभदायक

विशेष:- भौम चतुर्थी (स्नान-दान-जप-होम-श्राद्ध इ.साठी सूर्यग्रहणासमान पुण्यदायक)

👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणपतीला बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस लाल वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com