papmochani ekadashi 2023: मनोभावे पापमोचनी एकादशीचे व्रत केल्यास 'हे' होतात फायदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

papmochani ekadashi 2023

papmochani ekadashi 2023: मनोभावे पापमोचनी एकादशीचे व्रत केल्यास 'हे' होतात फायदे

हिंदू धर्म, संस्कृतीत वर्षभर काही ना काही सण, उत्सव, व्रत-पूजा केल्या जातात. फाल्गुन महिना संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत. चैत्राची चाहूल सर्वांना लागली आहे. आज पापमोचनी एकादशी आहे. फाल्गुन महिन्यातील वद्य एकादशीला पापमोचनी एकादशी म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, या एकादशीच्या व्रतामुळे जन्मांतरीच्या पापांपासून मुक्ती मिळत असल्यामुळे याला पापमोचनी एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूंच्या चतुर्भुज रुपाची पूजा केली जाते. 

या एकादशीबाबत अनेक मान्यता आहेत. होळीनंतर येणाऱ्या या एकादशीला अनन्य महत्त्व आहे. या दिवशी व्रत करणाऱ्यांनी श्रीमद्भागवताचे पठण केले पाहिजे, असे सांगितले जाते. पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला सकाळी आणि सायंकाळी धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. या व्रताने मनोवांच्छित इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. जाणून घेऊया पापमोचनी एकादशीचे व्रत केल्यास काय फायदे होतात.

1) पापमोचनी एकादशी व्रत केले असता सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते. यानिमित्ताने जाणते अजाणतेपणी झालेल्या पापांबद्दल भगवंताची क्षमा मागावी. 

2) पापांचा नाश झाल्यावर सुख समृद्धीची द्वारे आपोआप खुली होतात.

3) हे व्रत केले असता वाजपेय आणि अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते व सर्व कार्यात यश मिळते. 

4) हे व्रत केले असता मोक्ष प्राप्ती होते. भविष्यात आपल्या हातून पाप घडू नये, याची जाणिव करून देणारी ही एकादशी आहे. 

5) या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले वाहून त्यांची पूजा केल्यास कृपादृष्टी प्राप्त होते. 

6) या दिवशी नवग्रहांची पूजा केली असता, कुंडलीतील ग्रहांचा प्रकोप सौम्य होतो. 

7) पापमोचनी एकादशी व्रत केल्याने मनातील पापांचा निचरा होऊन मन निर्मळ बनते. 

8) कितीही अडचणी आल्या, तरी हे व्रत चुकवू नये. हे व्रत भक्तिभावे केले असता, उचित फलप्राप्त होते. या व्रतामुळे हर तऱ्हेच्या पापांपासून मुक्ती मिळते.

टॅग्स :cultureEkadashiHistory