सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक असतात ‘या’ गुणांमुळे खास | Birthday In september | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

september

Astrology: सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक असतात ‘या’ गुणांमुळे खास

वर्षाच्या वेगवेगळ्या बारा महिन्यात वेगवेगळे लोक जन्माला येतात. वेगवेगळ्या महिन्यात जन्माला येणाऱ्या लोकांचा स्वभावही वेगवेगळा असतो. महिन्यानुसार त्यांच्यातील गुण आणि स्वभाव वेगवेगळे असतात.

आज आपण सप्टेंबर महिन्याविषयी जाणून घेणार आहोत. सप्टेंबर महिना हा अंकशास्त्रानुसार मंगळचा महिना आहे. मंगळ हा उत्साही ग्रह आहे. आज आपण या महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव आणि त्यांच्यातील खास गुण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (People Born in September)

हेही वाचा: Baby Born Twice : आश्चर्यच! एकाच बाळाला दिला दोनदा जन्म, वाचा काय आहे प्रकरण

१. सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांना परफेक्शनिस्ट असे म्हणतात. कोणतेही काम हाती घेतल्यानंतर ते पुर्णत्वास नेईपर्यंत स्वस्थ बसत नाही. त्यांचा स्वत:वर खुप विश्वास असतो. यामुळे अनेकदा हे लोक स्वत: विरोधात काहीही ऐकत नाही.

२. या लोकांना त्यांच्या स्वभावाला मॅच असेच लोक आवडतात. त्यामुळे नवीन लोकांशी मैत्री करणे त्यांना कधी कधी कठीण जाते.

३. प्रेम आणि वैवाहीक आयुष्यात ते खुप आनंदी असतात. मात्र कधी कधी त्यांच्यातील वर्चस्ववादी स्वभावामुळे त्यांना नात्यात बऱ्याच संकटाचा सामना करावा लागतो.

हेही वाचा: Astrology: 'या' चार राशींच्या लोकांना मिळते सहज मनाप्रमाणे नोकरी

४. सप्टेंबर महिन्यात जन्मलेले पुरुष नेहमी डोक्याने विचार करतात तर या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया मात्र खुप संवेदनशील आणि भावनिक असतात.

५. या महिन्यात जन्मलेल्या लोकांच व्यक्तीमत्त्व खुप आकर्षित असतं. आपल्या बोलण्याने आणि राहणीमानावरुन ते समोरच्याचं मन जिंकून घेतात.

 ६. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया आणि पुरूष एक चांगले आईवडील बनतात. ते मुलांना समजून घेतात आणि वेळ आली तर समजून शकता.

हेही वाचा: Astro Tips: कोणत्या दिवशी हाताची नखे कापणे ठरू शकत तुमच्या करता शुभ...

७. याशिवाय या महिन्यात जन्मलेले लोग हे अतिशय रागीट असतात. कधी कधी त्यांचा हा स्वभाव त्यांचा फायदाही करुन देतो तर कधी कधी खुप मोठे नुकसानही करतो.

८. हे लोक खुप मेहनती असतात त्यामुळे त्यांना कोणतीही गोष्ट सहज मिळते आणि नोकरी तसेच करीअरमध्ये उच्च पदावर कार्यरत राहतात.

Web Title: People Born In September Are So Special Due To These Characteristics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..