Shani Jayanti : शनि जयंतीला जुळून येताय हे विशेष योग, अशा प्रकारे पूजा केल्यास होईल लाभ

शनि देवाची कृपा हवी असेल, तर येत्या शनि जयंतीला व्रत आणि पूजा करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकेल
Shani Jayanti
Shani JayantiSakal

Shani Jayanti : सूर्यपुत्र शनिदेव हे देवतांचे न्यायाधीश आणि दंडाधिकारी समजले जातात. शनि देवाची वक्रदृष्टी जर एखाद्या व्यक्तीवर पडली, तर त्याला राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही अशी मान्यता आहे. त्यामुळेच शनिदेवाची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी कित्येक लोक कायम प्रयत्नशील असतात. तुम्हालाही जर शनि देवाची कृपा हवी असेल, तर येत्या शनि जयंतीला व्रत आणि पूजा करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकेल.

यंदाची शनि जयंती ही १९ मे रोजी येत आहे. यावर्षीच्या शनि जयंतीला (Shani Jayanti 2023) आणखी काही विशेष योग जुळून येत असल्यामुळे ही जयंती अगदी खास ठरणार आहे. यंदाच्या शनि जयंतीला शोभन योग जुळून येतोय. १८ मे रोजी सायंकाळी सात वाजून ३७ मिनिटांपासून ते १९ मे रोजी संध्याकाळी सहा वाजून १७ मिनिटांपर्यंत हा योग असणार आहे.

तयार होणार खास योग

यासोबतच, शनि जयंतीच्या (Shani Jayanti) दिवशी चंद्र गुरू ग्रहासोबत मेष राशीमध्ये प्रवेश करेल. यामुळे गजकेसरी योग निर्माण होईल. शिवाय, शनिदेव देखील आपला प्रभाव असलेल्या कुंभ राशीमध्ये प्रवेश करतील ज्यामुळे शशयोग निर्माण होईल. यंदाच्या शनिजयंती दिवशीच ज्येष्ठ अमावस्या आणि वटसावित्री व्रत असे दोन्ही सण देखील साजरे होणार आहेत. त्यामुळे हा दिवस अगदी शुभ समजला जातो आहे.

Shani Jayanti
Shani Upay : शनिवारी या गोष्टींच दान करा, क्रोधीत शनी होईल शांत

अशी करा पूजा

शनिदेवाची पूजा करण्यासाठी आधी शनिदेवाच्या मूर्तीवर तेल, फुलांची माळ आणि प्रसाद अर्पण करा. त्यांच्या चरणांजवळ काळे उडीद आणि तीळ अर्पण करा. यानंतर दिवा लावून शनि चालिसाचे पठण करा. यासोबतच शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी 'ऊं शं अभयहंस्ताय नमः' या मंत्राचा जप करा. (Sanskruti)

Shani Jayanti
Shani Uday : 33 दिवसाच्या अस्तानंतर वाढणार शनिचा प्रभाव, देशात अन् जगात मोठे बदल अन् राशींवर प्रभाव

याव्यतिरिक्त 'ऊँ नीलांजनसमाभामसं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंडसंभूतं तं नमामि शनैश्चरम' या मंत्रानेही आपण शनिदेवाला प्रसन्न करू शकता. यंदाची शनि जयंती तिथी (Shani Jayanti Muhurta) १८ मे रोजी रात्री ९ वाजून ४२ मिनिटांनी सुरू होईल. तर १९ मे रोजी रात्री ९ वाजून २२ मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे.

शनि जयंतीच्या दिवशी दानपुण्य केल्याने आपल्यावर शनि देवाची कृपा कायम राहील.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीशी संबंधित असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com