
Soulmate Search : तुम्हीही 'सोलमेट'च्या शोधात आहात का? सद्गुरू सांगतात...
Soulmate Search : कहीं ना कही, कोई ना कोई सिर्फ मेरे लिए बना है, जोड्या स्वर्गात बनतात, माझ्यासाठी पण कोणीतरी खास बनलं असेल, यांचं भेटणं ठरलेलं होतं... अशा एक ना अनेक गोष्टी आपण कधी सिनेमात तर कधी प्रत्यक्षातही ऐकत असतो. कुठेतरी नकळत लोक याच्यावर विश्वास ठेवतात आणि आपल्या सोलमेटच्या शोधातही असतात.
पण आध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी याविषयी एक खास गोष्ट सांगितली आहे. जाणून घेऊया...
सोबती (सोलमेट) चा शोध का घेतला जातो?
सद्गुरू म्हणतात हा शोध कदाचित फक्त भौतिक आणि शारीरिक कारणांसाठी घेतली जाते. याशिवाय मानसिक आणि भावनिक कारणांनीपण हा शोध असू शकतो. ही दोन्ही कारणे त्यांच्या ठिकाणी सुंदर असू शकतात.
यात कोणतीही शंका नाही की, शारीरिक स्तरावर केली जाणारी सोबत जावन सुंदर बनवते. पण जर तुम्ही या गोष्टीकडे नीट लक्ष देऊन आणि स्वतःशी प्रामाणिक राहून बघितले तर तुमची हिच सोय भविष्यात तुमच्या चिंतेच कारणही बनू शकते.
वास्तवात जगा
त्यामुळेच कल्पनेच्या जगात न राहता वास्तवात जगा. नात्यांच्या सीमा आणि परिस्थितीशी प्रामाणिकता जपणे हेच शहाणपणाचे ठरते. त्यामुळेच जर भविष्यात काही कठीण प्रसंग आलेच तक तुम्ही ते मॅच्युअर्डली हँडल करू शकाल.
पण काही लोक स्वतःसाठी एक भ्रमाचं जाळं विणतात. सोलमेट, मेड इन हेवन सारख्या थेअरी बनवून त्यावर विश्वास ठेवतात.
लग्न वाईट गोष्ट आहे का?
सद्गुरु म्हणतात, लग्न अजिबात वाईट गोष्ट नाही. पण त्याला तुम्ही समाज व्यवस्थेचा भाग म्हणून बघितले आणि तेवढेच सहजतेने घेतले तर. याचा संबंध ब्रह्मांड, स्वर्ग याच्याशी जोडू नये आणि अवाजवी अपेक्षा, भ्रम बाळगू नये.
प्रेम कोणतीही वस्तू नाही. किंवा प्रेमाला कोणत्या वस्तूची आवश्यकता नाही. प्रेम म्हणजे फक्त एक भावना आहे. व्यक्ती शरीराने सोबत असो वा नसो ही भावना कायम राहते. प्रेमाला तुम्ही सीमा घालू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही प्रेमाची परिपूर्णता समजाल तेव्हा तुम्हाला हेपण समजेल की, आत्म्याला कोण्या सोबतीचा शोध नसतो.
सद्गुरू म्हणतात, सोलमेट म्हणताना आपण हे विसरून जातो की, आत्मा स्वतंत्र आहे. त्याचं कोणाशीच काही देणंघेणं नाही. त्याला कोणत्याही सोबतीचीही आवश्यकता नाही. जेव्हा आपण आत्म्याविषयी बोलतो तेव्हा आपण त्या असीमित परमतत्वाविषयी बोलत असतो. सोबतीची गरज त्यालाच असते जो अपूर्ण, सीमित आहे.