Tripurari Purnima 2022 : नशिबाला लागलेलं ग्रहण एका क्षणात सुटेल; सुवर्णयोगावर त्रिपुरारी पौर्णिमेला करा हे उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tripurari Purnima 2022

Tripurari Purnima 2022 : नशिबाला लागलेलं ग्रहण एका क्षणात सुटेल; सुवर्णयोगावर त्रिपुरारी पौर्णिमेला करा हे उपाय

Tripurari Purnima : वर्षभराच्या काळात एकूण बारा पौर्णिमा येतात. त्यात यावर्षीच्या कार्तिक पौर्णिमेला सर्वात जास्त महत्त्व आहे. त्रिपुरारी पोर्णिमा महादेवाशी संबंधीत आहे. भगवान शंकरांनी त्रिपुरासूराचा वध केला त्यामुळे या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे. आणि यंदा सोमवारीच पौर्णिमा आली आहे.

हेही वाचा: Tripurari Purnima 2022 : त्रिपुरारी पौर्णिमेला साजरा होतो हा अदभूत उत्सव; गोव्यात असाल तर नक्की भेट द्या

यामुळे हा शुभ योग तुमच्या सर्वांच्या इच्छा पुर्ण करु शकतो. तूमच्याही नशिबात काही अडचणींचा सामना करावा लागत असेल. तर, त्यावर आजच्या दिवशी केलेले उपाय फायदेशीर ठरणार आहेत.

हेही वाचा: Tripurari Purnima 2022 : कार्तिक पौर्णिमेला का म्हणतात त्रिपुरारी पाहुया काय आहे त्या मागची पौराणिक कथा

आज सायंकाळी ४ वाजून १५ मिनीटांनी पौर्णिमा लागते तर ती उद्या सायंकाळी ४ वाजून २१ मिनीटांनी संपते. ज्योतिषनुसार या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय केले तर प्रत्येक अडचण दूर होऊ शकते. या दिवशी केल्या जाणा-या उपायांविषयी जाणुन घ्या.

हेही वाचा: Kojagiri Purnima: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी प्रसन्न होणार; या ४ राशींची भरभराट होणार

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी नदी घाटावर दिपोत्सव साजरा केला जातो. तो पहाटेच्यावेळी असतो. पौर्णिमेच्या काळात गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते. तसेच या काळात नामस्मरण जप, तपश्चर्या, ध्यान योग आणि दान केल्याने इतर तिथींना केलेल्या दानापेक्षा अधिक फळ मिळते, असे मानले जाते.

हेही वाचा: Kojagiri Purnima 2022: आटलेल्या दुधाचे आयुर्वेदिक आणि मनोवैज्ञानिक महत्त्व काय? जाणून घ्या...

या दिवशी संध्याकाळी छोट्या द्रोणमध्ये दिवे ठेऊन ते नदीत प्रवाहित करणे. अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी रात्री चंद्र दर्शन घेऊन शिव, संभूती, प्रीती, संताती, अनुसुईया आणि क्षमा या 6 तपस्वी कामांची पूजा केली जाते. या सर्व स्वामी कार्तिकच्या माताही आहेत. असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने घरात धनधान्य आणि धनाची वृद्धी होते.

हेही वाचा: kojagiri purnima 2022: काय आहे कोजागिरी पौर्णिमेची आख्यायिका?

कार्तिक पौर्णिमा ही शांती आणि पितरांच्या उपासनेसाठीही शुभ मानली जाते. याच कारणामुळे पांडवांनी या दिवशी महाभारत युद्धात मारल्या गेलेल्या योद्ध्यांच्या आत्म्याचे शांततेसाठी पूजन केले होते. त्यामुळे आजच्या दिवशी पिचरांसाठी नैवेद्य आणि त्यांचे स्मरण करणे शुभ असते.

हेही वाचा: Rakhi Purnima ;बहीण माझी लाडाची

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. तसे करणे कठीण असेल तर आजच्या भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावून पूजा केल्याने अडचणी दूर होतात. तसेच, विशेष पुण्य पदरात पडते.

हेही वाचा: kojagiri purnima 2022: कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व...

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीही उपवास ठेवला जातो. असे केल्याने सूर्यलोकाची प्राप्ती होते असे मानले जाते. या दिवशी भाविक दिवसभर उपवास करतात आणि रात्री जागरण करतात. याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा ऐकण्याचीही परंपरा आहे.