
Astrology : नारळ उभा फुटण्याचा अर्थ काय? शुभ की अशुभ...जाणून घ्या
आपल्याकडे कोणतंही शुभ कार्य असेल तर त्याची सुरुवात नारळ फो़डून केली जाते. काही घरांमध्ये तर अमावस्या, पौर्णिमेलाही नारळ फोडला जातो. नारळ कसा फुटला, कसा निघाला, चव कशी आहे, या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र सांगितलं जातं.
आपल्याकडे नारळासंबंधित अनेक समजुती आहेत. म्हणजे नारळ एका दमात फुटला तर शुभ मानलं जातं. नारळ नासका निघाला म्हणजे नारळ पावला...म्हणजे चांगलं झालं. या अनेक समजुती कुठून आल्या, कशा आल्या हे मात्र सांगता येणं अवघड आहे. पण कधी तुम्ही पाहिलं आहे का...नारळ कायम मधून फुटतो. म्हणजे वरुन किंवा खालून फुटत नाही. याचं काय कारण?
जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी कडक वाळलेल्या लाकडाप्रमाणे झालेला असतो. नारळ फोडताना तो सरळ धरलेला असतो. नारळाची शीर त्याच्या मध्यभागी असते. त्यावर आघात होतो आणि शिरेवरच त्याचे दोन भाग होतात. यामागे खरंतर असं विशेष कारण नाही. नारळ कितीही आपटला तरी तो उभा फुटत नाही. कारण त्यावर होणारा आघात मध्यभागी होतो. नव्या नारळाचं कवच कडक नाही तर ओलसर असतं. (Astro Tips)
नारळ फोडण्याची सोपी पद्धत
एका पॅनमध्ये पाणी तापवा. नारळ्याच्या शेंड्या काढून नारळ गरम पाण्यात ठेवा. पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उकळायला ठेवा. १०-१५ मिनिटांनंतर करवंटीचा रंग काळसर होतो. त्यानंतर नारळ गार झाल्यावर फोडावं. त्यानंतर करवंटीपासून खोबऱ्याची वाटी निघून येईल.