खडकवासला धरण भरले; पाणी सोडण्यास सुरवात

बुधवार, 3 ऑगस्ट 2016

पुणे - मंगळवारी रात्री दहा वाजल्यानंतर आज (बुधवार) सकाळी सहा वाजेपर्यंत धरण परिसरात मुसळधार पाऊस झाला असून, धऱणपातळीत मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण 99 टक्के भरले असून, मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे, धरणातून दहा वाजता सुमारे 4280 क्‍युसेकने पाणी सोडण्याचा निर्णय खडकवासला पाटबंधारे विभागाने घेतला आहे.

सकाळी दहा वाजता पाच दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले होते. तर सकाळी अकरा वाजता 11 दरवाजे उघडून सुमारे 10 हजार क्‍युुसेकने सोडण्यात येणार आहे. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडूरंग शेलार व शाखा अभियंता आर. एस. क्षीरसागर यांनी दिली. पानशेत वरसगाव धरणावर 200 मिलिमिटर पर्यंत पाऊस पडल्याने भिंती खालील पडलेला पावसाचे पाणी खडकवासला धरणात जमा होत होते. त्यावेळी सुमारे पहाटे 15 हजाराच्या पुढे येवा खडकवासला धरणात जमा होत होता. रात्री दहा वाजता खडकवासला धरण 66 टक्के भरले होते. सकाळी सहा वाजता 86 टक्के भरले तर आठ वाजता 96 टक्के भरले. खडकवासला धरण 100 टक्के भरल्यावर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे ही शेलार यांनी सांगितले.
 
Web Title: Dam

टॅग्स