मनोहर पर्रिकर राफेलचे पहिले बळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मार्च 2019

मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर राफेल घोटळ्यातील पहिले बळी ठरले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पर्रिकरांच्या पार्थिवाला काही वेळापुर्वीच अग्नी देण्यात आला असताना आव्हाडांनी केलेल्या या आरोपामुळे राजकिय क्षेत्रात चर्चा सुरु झाल्या आहेत. 

आव्हाड म्हणाले, राफेल घोटाळ्यामुळे पर्रिकरांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. अन्यथा ते आणखी आयुष्य जगू शकले असते. राफेल कराराला पर्रिकरांचा विरोध होता म्हणूनच त्यांना त्या पदावरून हटवून पुन्हा गोव्यात पाठविण्यात आले. पर्रिकरांच्या राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजत याची चर्चा सुरु होती असेही आव्हाड म्हणाले.

मनोहर पर्रिकर यांच्या शनिवारी कर्करोगाच्या दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले. देशभरातील विविध राजकिय पक्षांचे नेते त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित होते. आज काहीवेळापुर्वीच त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला आहे. पर्रिकरांच्या जाण्याने देशभर हळहळ व्यक्त केली जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र गंभीर आरोप केल्याने राजकिय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

Web Title: Manohar Parrikar is first victim of Rafale scam says jitendra awhad