#MarathaKrantiMorcha संभाजीराजेंच्या मागणीनंतर नायडू म्हणाले, मुख्यमंत्र्यांना रोखणे योग्य आहे का?

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जुलै 2018

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून आरक्षणासाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यभरात आज (मंगळवार) बंदची हाकही देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बोलताना म्हटले, की आरक्षणाची मागणी ठीक आहे पण मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणे योग्य आहे का?

नवी दिल्ली - राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून आरक्षणासाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यभरात आज (मंगळवार) बंदची हाकही देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बोलताना म्हटले, की आरक्षणाची मागणी ठीक आहे पण मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणे योग्य आहे का?

राज्यसभेत बोलताना संभाजीराजे म्हणाले की, शाहू महाराजांनी भारतात पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण दिले होते. यात मागासवर्गीय समाजासह मराठा समाजालाही स्थान होते. पण स्वातंत्र्यानंतर आरक्षणात मराठा समाजाला स्थान देण्यात आले नाही. गेल्यावर्षी अनेक मोर्चे निघाले, त्याची दखल देशाने घेतली. आता मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील सर्व घटकांना बोलवावे आणि त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा. तसेच याचे राजकारण करण्यापेक्षा सर्वपक्षीय लोकांना एकत्र आणून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 

संभाजीराजेंच्या या निवदनानंतर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकया नायडू यांनी आरक्षणाची मागणी योग्य आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांना पुजेसाठी मंदिरात जाऊ न देणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला. 

दरम्यान, काल (सोमवार) काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक समाजाने दिली आहे. त्याचबरोबर, ठिकठिकाणी समाजाकडून निदर्शनेही करण्यात येत आहेत.

Web Title: MarathaKrantiMorcha vice president naydu statement after sambhajiraje talk in rajysabha