जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू- राजनाथसिंह

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली- पाकिस्तानने पकडलेल्या भारतीय जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज (शुक्रवार) दिली.

धुळे येथील चंदू चव्हाण हे लष्कराच्या आमर्ड रेजिमेंटमध्ये जवान म्हणून कार्यरत आहेत. टट्टापानी येथे ते कार्यरत असून, सीमेवर तैनात असताना ते चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेले होते. यानंतर पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतले आहे.

राजनाथसिंह म्हणाले, ‘पाकिस्तानसमोर जवानाच्या सुटकेचा मुद्दा ठेवण्यात आला आहे. सुटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवाय, अख्नूर सेक्टर भागात पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. यामुळे लष्कराच्या जवानांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पंजाब व जम्मू-काश्मीरमधील सीमेवर असलेली एक हजार गावे खाली करण्यात आली आहेत. पंजाबमध्ये अतीदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.‘

‘सर्जिकल स्ट्राईक‘नंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले.

Web Title: Singh tried to start adding the release