नाशिकचे केशव गोसावी काश्‍मीरमध्ये हुतात्मा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

जम्मू : पाकिस्तानी सैन्याने आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग केला. त्यात महाराष्ट्रातील केशव गोसावी (वय 29) यांच्यासह दोन जवान हुतात्मा झाले. 

पाकिस्तानी स्नायपरनी राजौरी सेक्‍टरमधील नौशेरा भागात आज गोळीबार केला. त्यांनी 24 मराठा रेजिमेंटच्या रोजा येथील चौकीला लक्ष्य केले. या गोळीबारात नाईक केशव सोमगिर गोसावी हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. गोसावी हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्‍यातील श्रीरामपूर या गावचे रहिवासी आहेत. 

दुसऱ्या घटनेत नौशेरा सेक्‍टरमध्ये कलाल भागात रायफलमन वरुण कट्टल (वय 21) हे हुतात्मा झाले. गेल्या तीन दिवसांतील पाकिस्तानी स्नायपरनी केलेला हा तिसरा हल्ला आहे. या गोळीबारानंतर भारतीय जवानांनी पाकला जशास तसे उत्तर दिले. 
 
Web Title: Solider of Indian army Keshav Gosavi Martyr in Kashmir