'फोर्ब्स'च्या यादीत अक्षयकुमारची बाजी 

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जुलै 2018

फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेता अक्षयकुमार व सलमान खान यांना यंदाही स्थान मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीत अमेरिकेचा फ्लॉइड मेवेदर (बॉक्‍सर) अव्वलस्थानी आहे.

नवी दिल्ली - फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेता अक्षयकुमार व सलमान खान यांना यंदाही स्थान मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीत अमेरिकेचा फ्लॉइड मेवेदर (बॉक्‍सर) अव्वलस्थानी आहे. 

जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या 100 व्यक्तींची यादी फोर्ब्सने नुकतीच जाहीर केली. त्यात अक्षयकुमार 76 व्या स्थानावर असून, गेल्यावर्षी तो 80 व्या स्थानावर होता. सलमान खानचे यादीतील स्थान यंदा घसरले असून, तो 82 व्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी या यादीत 65 व्या स्थानावर वर्णी लागलेला शाहरुख खान यंदा मात्र पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवू शकला नसल्याचे स्पष्ट झाले. 

दरम्यान, या यादीत अभिनेता जॉर्ज क्‍लूनी (2), रियल्टी टीवी स्टार कायली जेनर (3), फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनॉल्डो (10), पॉप स्टार केट पैरी (19), टेनिसपट्टू रॉजर फेडरर (23), गायक बेयान्स (35), लेखिका जे. के. रोलिंग (42) तर गोल्फर टाइगर वूड्‌स 66 व्या स्थानावर आहेत. 

कोणी किती कमविले 
फ्लॉइड मेवेदर - 28.5 
अक्षयकुमार - 4.5 
सलमान खान -3.77 
(आकडे कोटी डॉलरमध्ये) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar Forbess 2018 list of worlds highest paid actor