गुट्टेप्रकरणी अनुपम खेर यांनी स्पष्टीकरण द्यावे: मलिक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

जीएसटी चोरी प्रकरणी 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' सिनेमात मुख्य भूमिका करणाऱ्या अनुपम खेर यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

मुंबई: जीएसटी चोरी प्रकरणी 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' सिनेमात मुख्य भूमिका करणाऱ्या अनुपम खेर यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

जीएसटी चोरी प्रकरणी 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' या सिनेमाचे प्रोड्यूसर विजय गुट्टे यांना अटक केली असून त्याचे वडीलही रत्नाकर गुट्टे चौकशीच्या फेऱ्यात आहेत. त्यामुळे 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्या खेर यांचे काय म्हणणे आहे, असा सवाल मलिक यांनी ट्वीट वरुन केला आहे. 

साखर कारखानदार असलेल्या गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावावर करोड़ो रूपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. या संदर्भात विधिमंडळात विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते. भाजपा सरकार गुट्टे यांना वाचवत असल्याचा आरोप विधिमंडळात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anupam Kher clarifies in the gutte case says malik