दिलीप कुमार लिलावती रुग्णालयात

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 डिसेंबर 2016

मुंबई - उजव्या पायाला सूज आल्याने आणि त्रास जाणवू लागल्याने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पत्नी सायरा बानो यांनी मंगळवारी सकाळी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल केले आहे.

मुंबई - उजव्या पायाला सूज आल्याने आणि त्रास जाणवू लागल्याने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पत्नी सायरा बानो यांनी मंगळवारी सकाळी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल केले आहे.

डॉक्‍टरांचे विशेष पथक दिलीप कुमार यांना यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सायरा बानो म्हणाल्या, 'मी त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात नेणारच होते. मात्र सूज आल्याचे मला जाणवले. त्यांना कफचाही  त्रास होत होता. त्यांच्या आरोग्याबाबतच्या कोणत्याही तक्रारीकडे मी दुर्लक्ष करत नाही. डॉक्‍टर त्यांची तपासणी करत आहेत. ते सध्या डॉक्‍टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. काहीही गंभीर नसावे अशी मला आशा आहे.'

आरोग्याच्या छोट्या-मोठ्या गेल्या तक्रारींमुळे दिलीपकुमार यांना मागील काही वर्षांत अनेकदा वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. येत्या 11 डिसेंबरला दिलीप कुमार आपला 94 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

Web Title: Dilip Kumar hospitalised