रजनीकांत यांचा काला आज प्रदर्शित होणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

रजनीकांतचा बहुचर्चित चित्रपट "काला'च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे हा चित्रपट उद्या (ता. 7) प्रदर्शित होणार आहे. 
 

नवी दिल्ली - रजनीकांतचा बहुचर्चित चित्रपट "काला'च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे हा चित्रपट उद्या (ता. 7) प्रदर्शित होणार आहे. 

एस. राजशेखरन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या चित्रपटातील कथानक त्याने लिहल्याचा दावा केला असून, आपली परवानगी न घेताच कथानकाचा वापर केल्याचे याचिकेत म्हटले आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना म्हटले, की याचिकाकर्त्याचा दावा खरा असेल तर ते भरपाईसाठी दावेदार आहेत आणि यासाठी उच्च न्यायालयात जावे. राजशेखरन यांनी यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सुनावणीसाठी चित्रपट प्रदर्शनानंतरची तारीख देण्यात आली होती. त्यामुळे राजशेखरन यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Kaala' to release tomorrow, Rajinikanth breathes a sigh of relief after Supreme Court's ruling