काजोलने नाकारली 'दबंग 3'ची ऑफर

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

मुंबई - अभिनेता सलमान खानच्या "दबंग‘ व "दबंग 2‘ या चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर "दबंग 3‘ चित्रपटाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यात दोन अभिनेत्री असतील. त्यापैकी एकीची भूमिका सोनाक्षी सिन्हा करणार असून दुसऱ्या नायिकेसाठी काजोलला ऑफर देण्यात आली होती; मात्र तिने ही ऑफर नाकारल्याचे बोलले जात आहे.

काजोलने गेल्या वर्षी शाहरूख खानसोबत "दिलवाले‘ चित्रपट केला होता. त्यानंतर ती एकाही चित्रपटात दिसलेली नाही. तिने आणि सलमानने "करण-अर्जुन‘, "प्यार किया तो डरना क्‍या‘, "कुछ कुछ होता है‘ या चित्रपटांत काम केले होते. त्यातील त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, "दबंग 3‘चा निर्माता अरबाज खानला खलनायिकेच्या भूमिकेसाठी उत्तम अभिनेत्री हवी होती. त्यामुळे त्याने काजोलकडे विचारणा केली होती; मात्र तिला खलनायिकेपेक्षा महत्त्वाची भूमिका साकारायची होती. त्यामुळे तिने ऑफर नाकारल्याचे बोलले जाते.

"दबंग 3‘मध्ये सोनाक्षी सिन्हा नसल्याची चर्चा सुरुवातीला होती; मात्र अरबाजने सलमानसोबत सोनाक्षी झळकणार असल्याचे सांगितल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. या चित्रपटातील खलनायिकेच्या भूमिकेसाठी काजोलने नकार दिल्यानंतर आता कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागते, हे पाहावे लागेल. 

Web Title: Kajol denied 'Dabangg 3 offer