वाचा कोण आहे, 'टिक-टॅाक की मधुबाला'

वाचा कोण आहे, 'टिक-टॅाक की मधुबाला'

नवी दिल्ली : सध्या बहुतांश तरुणात टिक-टॅाक या अॅपचे वेड पाहायला मिळत आहे. दरम्यान या टिक-टॅाकने अनेक जणांना रातोरात फेमस केले असून यातच एक नाव आहे ते प्रियांका कांडवाल... प्रियांका ही टिक-टॅाकवर आपले विविध व्हीडिओ तयार करत असून यात विशेषत: ती प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला हीच्या गाण्यांचे किंवा डायलॅागचे व्हीडिओ तयार करताना दिसून येते. त्यामुळेच तिला तिच्या चाहत्यांनी 'टिक-टॅाक की मधुबाला' असे नाव दिले असून याच नावाने ती सध्या इंटरनेटवर प्रसिद्द झाली आहे. 

प्रियांकाने आतापर्यंत केलेल्या व्हीडिओमध्ये, 'हाल केसा हे जनाब का?, अच्छा जी मे हारी, देखने मे भोला हे' यासारख्या गाण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या व्हीडिओडजना तिने ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट दिला असल्याने पाहणा-यांना हे व्हीडिओ आणखीनच आवडत आहेत. 

काय आहे टिक-टॅाक 

टिक-टॅाक हे एक मोबाईल अॅप असून यात विविध प्रकारच्या गाण्यांवर किंवा डायलॅागवर आपल्याला आपले व्हीडिओ तयार करता येतात आणि याच अॅपवर आपण ते शेअर देखील करु शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com