सैन्यामुळेच आपण सुरक्षित - अमिताभ बच्चन

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 ऑक्टोबर 2016

मुंबई - देशवासियांनी आपल्या सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. सीमेवर वीरमरण पत्करणाऱ्या जवानांप्रती आपण एकता दाखविणे गरजेचे आहे. सैन्यामुळे आपण सुरक्षित आहोत, असे मत बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले.

अमिताभ बच्चन यांचा आज (मंगळवार) 74 वा वाढदिवस आहे. अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना बच्चन यांच्या ‘जलसा’ या बंगल्यावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपले मत करत चाहत्यांचे आभार मानले.

बच्चन म्हणाले, की सीमेवर सुरु असलेल्या घटनांमुळे देशातील जनता अतिशय संतप्त आहे. जवान आणि सैन्यदल प्राणांची बाजी लावत असल्याने मी आणि तुम्ही सुरक्षित आहोत. त्यांच्याप्रती एकता दाखवण्याची हीच वेळ आहे. पाकिस्तानी कलाकारांबद्दल बोलण्याची ही वेळ नाही. भविष्यातही मला चांगली भूमिका मिळाव्यात आणि मी काम करत रहावे अशी माझी प्रार्थना आहे. राष्ट्रपती होण्याबाबत चेष्टा सोडून प्रश्न विचारा. शत्रुघ्न बाबू चेष्टा करतात, हा त्यांचा बालिशपणा आहे. असे कधीही होणार आहे. आमीर खान हा उत्कृष्ट अभिनेता असून बॉक्स ऑफिस आणि बॉलिवूडवर तोच राज्य करतो. ‘ठग’ सिनेमात त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

Web Title: We attributed the army safe - Amitabh Bachchan