सलमान पुन्हा व्यक्त झाला "त्या' वक्तव्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने महिला आयोगाला आज पुन्हा एकदा उर्मट उत्तर पाठवले आहे. "सुलतान‘ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्याला एकूण तीन वेळा नोटीस बजावलेली होती. मात्र राज्य महिला आयोगाने नोटीस पाठविल्यानंतर आज अखेर या अभिनेत्याने त्याला उत्तर दिले. या प्रकरणी सलमानने माफीसाठी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांनी या वृत्ताला दुजोरा देत एएनआयशी बोलताना सांगितले, की सलमानकडून कालच या नोटिशीचे उत्तर आले असून, या प्रकरणी पुढे कोणती कायदेशीर कार्यवाही करता येईल, याचा विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येईल.

या संदर्भात अधिक तपशील उपलब्ध नसून, काही खासगी वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, खानच्या कायदेतज्ज्ञांनी महिला आयोगाने हे प्रकरण हाताळण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
सलमान खानने या प्रकरणी माफी मागण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे.

सलमान खानच्या या वक्तव्यावरून राष्ट्रीय महिला आयोगानेदेखील एकदा नोटीस बजावलेली होती. या विधानावरून नेटिझन्सनीदेखील प्रचंड टीका केली होती. राज्य महिला आयोगाने या नंतर दोनदा नोटीस पाठवूनही सलमान खानने त्यावर उत्तर पाठविले नव्हते.

Web Title: No Apology from Salman, Says Women's Panel Can't Summon Him