हे कोण म्हणतेय - संघावर बंदी घाला...

हे कोण म्हणतेय - संघावर बंदी घाला...

अमृतसर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी पंजाबच्या सर्वोच्च अकाल तख्ताचे प्रमुख हरप्रीत सिंह यांनी केली आहे. तसेच संघ हा देशातील जनतेत फुट पाडत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या काही कृती करत आहे, त्यातून तो भारतीय नागरिकांत असंतोष निर्माण करून त्यांच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.'' असे हरप्रीत यांनी म्हटले आहे. त्यांनी अमृतसर येथे पत्रकारांशी बोलत असताना हे विधान केले आहे. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानावर हरप्रीत यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. 

''जोपर्यंत किमान एक भारतीय हा स्वत:ला हिंदू म्हणवून घेत आहे तोवर भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे.'' असा दावा दस-याच्या मूहर्तावर भागवत केला होता. दरम्यान त्यांच्या अशा प्रकारच्या विधानांमुळे भारतीय जनतेत व्देष निर्माण होईल आणि फुट पडेल असे हरप्रीत सिंह म्हटले आहेत. तसेच संघाचे भाजपशी संबंध असल्यास याचा देशाला किंवा देशातील जनतेला काही फायदा नाही असेही ते म्हटले. तसेच भागवतांच्या या विधानावर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गोबिंदसिंग लोंगोवाल यांनीही आक्षेप घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com