बनावट डॉलर देऊन चार लाखांचा गंडा 

बनावट डॉलर देऊन चार लाखांचा गंडा 

मुंबई : कमी दरात अमेरिकी डॉलर देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या बांगलादेशी टोळीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. रेल्वे पोलिसांनी या भामट्यांकडून 75 हजार रुपये, 20 अमेरिकी डॉलरच्या चार नोटा, नोंदवही, पॉकेट डायरी, बांगलादेशी पारपत्राच्या छायाप्रती जप्त केल्या आहेत. 

24 सप्टेंबरला भायखळा रेल्वेस्थानकात अशरफ अली इदू खान उभा होता. त्या वेळी शरीन नावाच्या महिलेने त्याला 20 अमेरिकी डॉलरची नोट दाखवली. आमच्याकडे 1700 डॉलरच्या नोटा असून, एक नोट 300 रुपयाला देऊ, असे तिने सांगितले. तिने खानच्या हातात 20 डॉलरची नोट आणि मोबाईल क्रमांक लिहिलेला कागद दिला. 

त्यानंतर खान याने एका बॅंकेत जाऊन 20 अमेरिकी डॉलरची नोट खरी असल्याची खात्री करून घेतली. या नोटेचे भारतीय चलनात मूल्य 1400 रुपये असल्याची माहिती त्याला बॅंकेतून मिळाली. फक्त 300 रुपयांत 20 अमेरिकी डॉलरची नोट मिळणार, म्हणून खानने लता अक्तर, बताशी अक्तर या बांगलादेशी नागरिकांशी संपर्क साधला. 

या प्रकरणाचा तपास करताना रेल्वे पोलिसांना 15 ऑक्‍टोबरला महानगरी एक्‍स्प्रेसवर दरोडा पडणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी कारवाई करून पश्‍चिम बंगालचा रहिवासी असलेला शफिउद्दीन लुतफर आणि डोंबिवलीत राहणारा अमन यांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता डॉलरच्या बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याचा गुन्हा उघडकीस आला. 

पोलिसांनी या टोळीकडून 75 हजार रुपये, 20 अमेरिकी डॉलर मूल्याच्या चार नोटा, नोंदवही, पॉकेट डायरी, बांगलादेशी नागरिकत्वाच्या पारपत्राच्या छायाप्रती आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे. 


अशी झाली फसवणूक 

बांगलादेशी टोळीने अशरफ खानला घाटकोपर येथे बोलावले आणि 1700 अमेरिकी डॉलरच्या नोटा चार लाख रुपयांत देण्याचा व्यवहार ठरला. त्यानुसार खानने चार लाख रुपये रोख दिल्यावर या टोळीने रुमालात गुंडाळलेल्या 1700 डॉलरच्या नोटा दिल्या. या नोटा खोट्या असल्याचे समजल्यावर खानने आपली फसवणूक झाल्याची तक्रार सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यात नोंदवली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com