जगण्याविषयी सुपर पॉझिटिव्ह होता कुशल पंजाबी, तरी....

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

छोट्या पडद्यावरील अभिनेते कुशल पंजाबीच्या आत्महत्येमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. कुशलचा जुना मित्र चेतन हंसराजने म्हटलं की, कुशल आजारपणामुळे व्यथित होता, यामुळे त्याने आत्महत्या केली. बॉम्बे टाइम्सने काही दिवसांपूर्वी कुशलची मुलाखत घेतली होती. यात त्याने सकारात्मक बाबी सांगितल्या होत्या. या मुलाखतीचा संपादीत अंश... 

हे वाचलंत का - काय आहे कुशलच्या आत्महत्येचं कारण

छोट्या पडद्यावरील अभिनेते कुशल पंजाबीच्या आत्महत्येमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. कुशलचा जुना मित्र चेतन हंसराजने म्हटलं की, कुशल आजारपणामुळे व्यथित होता, यामुळे त्याने आत्महत्या केली. बॉम्बे टाइम्सने काही दिवसांपूर्वी कुशलची मुलाखत घेतली होती. यात त्याने सकारात्मक बाबी सांगितल्या होत्या. या मुलाखतीचा संपादीत अंश... 

हे वाचलंत का - काय आहे कुशलच्या आत्महत्येचं कारण

मुंबईत राहणं सोपं नाही, परंतु हे मी सांभाळून घेतो. कामाच्या पुढे जाऊन जगणं शिकायला हवं. अनेक वेळा मी मागे वळून पाहतो तर, असं वाटतं की, जर मी फक्त कामावर लक्ष केंद्रीत केलं असतं तर मी जास्तीत जास्त यशस्वी अभिनेता होऊ शकलो, परंतु मला हवं तसं जगू शकलो नसतो. यामुळे मला फिरायला आवडतं, बाइक रायडिंग देखिल आवडतं. जे
करताना मी खरोखर जगत असतो.

हायप्रोफाईल वेश्याव्यवसायावर पोलिसांनी घेतला हा निर्णय

मी माझ्या मुलासोबत वेळ घालवण्यासाठी सरळ कामाची वेळ कमी करतो. जर तुम्ही कामंच करत राहिलात तर तुम्हाला काहीच करता येणार नाही. मला मान्य आहे की, पैसा चांगला असतो, परंतु तुमच्यातली तरूणाई परत येणार नाही. जेव्हा माझा मुलगा लहान होता तेव्हा घरी त्याच्यासोबत वेळ घालवायला मला आवडत होतं. परंतु आता तो 3 वर्षाचा आहे. आणि
तो शांघायमध्ये आपल्या आई सोबत आहे. मी एकटाच आता मुंबईत आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे.

ही आहे यंदा सर्वाधिक सर्च झालेली अभिनेत्री

मी आपल्या प्रोजेक्टमध्ये नेहमी ब्रेक घेत असतो. ट्रॅव्हलींग करत असतो. वेगवेगळे कोर्स करत असतो. एक वेळ अशी होती की, मी अमेरिकेत बारटेंडिंग केली होती. मला डान्स करण्याची इच्छा होती. परफॉर्म करण्याची इच्छा होती. स्टेज, टीव्ही कार्यक्रम, चित्रपट आणि वेबसिरिज मध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यानंतर ते मोठ्या संघर्षातून मिळत गेलं. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर रिजेक्शन आणि एक्सेप्टन्सला समोरे गेलो आहे. अभिनयाचे काम माझ्या आयुष्याचा छोटा भाग आहे. मी नेहमी आवड, वयक्तिक आयुष्य आणि व्यवसायाला समतोल वेळ देण्याचा प्रयत्न करतो. मी कधीही सासु सुनांचे पात्र असलेल्या मालिकांमध्ये काम नाही केले. माझ्या भूमिकांमध्ये विविधता ठेवण्यावर भर दिला.

ती मुलीसह घराबाहेर पडली अन् परतलीच नाही... वाचा काय आहे प्रकरण

मला माहित नाही की, मी एखादा प्रोजेक्ट घेऊन चुक केली की काय? मी हा नशिबाचा भाग समजतो. दुसरीकडे माझे छोटेसे आनंदी कुटूंब आहे. आणि मस्त दिलदार मित्र आहेत. हीच माझी संपत्ती आहे. मी खुप समाधानी आहे. मला असं म्हणता येईल, की मी ज्याठिकाणी असणं अपेक्षित होतं त्याठिकाणी नाहीये, आणि असंही म्हणू शकतो, की मी बरोबर त्याच
ठिकाणी आहे जिथे असणं मला अपेक्षित होतं. दोन्ही बाजू आहेत. परंतु मी सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रीत करतो. जे काही होईल त्याविषयी मी सुपर पॉझिटिव्ह आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kushal Punjabi was super positive about living, though