अंधपणावर मात करत प्रांजल झाली IAS

अंधपणावर मात करत प्रांजल झाली IAS

तिरुअनंतपुरम : इच्छाशक्ती प्रबळ असली की आपण हवे ते सारे आत्मसात करू शकतो, असे म्हटले जाते. याचाच खराखुरा प्रत्यय आलाय तो उल्हासनगरच्या प्रांजल पाटीलच्या बाबतीत... प्रांजल या अंध मुलीने ‘यूपीएससी’च्या परिक्षेत नेत्रदिपक यश मिळवत पहिली दृष्टीहिन उपजिल्हाधिकारी होण्याचा मान मिळवला आहे.

महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील रहिवाशी असणा-या प्रांजल हीने आपल्या अथक परिश्रमांनी ‘यूपीएससी’ची परिक्षा पास करत हे यश मिळवले आहे. प्रांजलची दृष्टी ही जन्मापासूनच कमकुवत होती. मात्र वयाच्या सातव्या वर्षी तिची दृष्टी पूर्णत: गेली. परंतू त्यावरही मात करत तिने आपला अभ्यास सुरूच ठेवला आणि ‘यूपीएससी’मध्ये 124 वा रॅंक मिळवला. त्यानंतर प्रांजलने केरळ केडर निवडल्यानंतर सध्या तिची नियुक्ती केरळच्या तिरुअनंतपुरम येथे उपजिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com