हुबळीतील स्फोटाच्या पार्सलवर, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आमदाराचे नाव

Currier named MLA Prakash Abitkar
Currier named MLA Prakash Abitkar

कोल्हापूर - हुबळी रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण स्फोटामागे कोल्हापूर कनेक्‍शन असल्याची शक्‍यता गृहीत धरून जिल्ह्यात सतर्क राहण्याचे आदेश आज पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले. बॉम्ब शोधक नाशक आणि दहशतवाद विरोधी पथक तपासासाठी तातडीने हुबळीला पाठविण्यात आले आहे.

उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली शुक्रवारी (ता. १८) रात्री स्फोट झाला होता. यात एक ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. पुलाखाली घडलेल्या या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली होती. मुंबई, पुणे, हैदराबाद येथील पथकांनी घटनास्थळी भेट देऊन स्फोटामागील कारणांचा तपास सुरू केला होता. या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले.

चौकशीत डुकराच्या शिकारीसाठी लसणाच्या आकाराची स्फोटके तयार करून ती डब्यातून घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस पथकांना पाहून संशयितांनी हा डबा पुलाखाली ठेवला. इतर स्फोटक पदार्थ जवळच्या नाल्यात दडवून ठेवली होती. या स्फोटकात सल्फर, पोटॅश, दोऱ्या, गारगोटी आदींचा वापर करण्यात आल्याची माहिती पुढे आली. महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याने या प्रकरणाचा लवकरच छडा लावू, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, तामिळनाडूमधून रेल्वेतून एक पार्सल कोल्हापूरला येत होते. कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्टेशनवर त्याचा अचानक स्फोट झाला. यात दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यामुळे हुबळीत एकच खडबळ उडाली. या घटनेचे कोल्हापूर कनेक्‍शन असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

निवडणूक काळात घडलेल्या या घटनेमुळे पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच उजळाईवाडी व हुबळी स्फोटाचे काही कनेक्‍शन याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. प्रथमदर्शी दोन्ही स्फोटात साम्य दिसत असल्याने त्याअनुषंगाने बॉम्ब शोधक व नाशक आणि दहशतवादविरोधी पथकाला तपासासाठी तातडीने हुबळीला पाचारण करण्यात आले आहे.  

स्फोटाची माहिती घेण्यासाठी एक पथक हुबळीला रवाना करण्यात आले आहे. निवडणुकीचा काळ असल्याने सर्वांनी सतर्क राहावे. संशयित व्यक्ती किंवा वस्तूबाबत नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. 
- डॉ. अभिनव देशमुख,
जिल्हा पोलिस अधीक्षक

बकेटवर आबिटकरांचे नाव
रेल्वे स्थानकावर संशयित वस्तूंचा शोध घेताना आणखी काही बकेट स्वरूपातील पार्सल्स सापडल्या. एका बकेटवर कोल्हापूरमधील राधानगरी-भुदरगडचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव आढळून आले. बकेटवरील नावामुळे यादृष्टीने चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अशा प्रकारचे विषय माझ्याशी संबंधित असूच शकत नाहीत. माझ्यापर्यंतही ही माहिती आलेली आहे; पण पोलिसांकडून अद्याप माझ्याशी संपर्क नाही. मुळात निवडणुकीमुळे मी गेले दोन-तीन महिने मतदारसंघातच अडकून आहे. याबाबत कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे.
- प्रकाश आबिटकर,
आमदार, राधानगरी-भुदरगड

हाय ॲलर्ट असूनही स्फोट
दोनच दिवसांपूर्वी कोल्हापुरातील उजळाईवाडीतील शाहू टोलनाक्‍यानजीक प्लास्टिकमध्ये ठेवलेल्या वस्तूचा स्फोट होऊन ट्रकचालकाचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र दक्षता घेण्यात आली होती. कर्नाटकात सुमारे २२ दहशतवादी असल्याचा इशारा गुप्तचर खात्याने दिल्यानंतर राज्यात हाय ॲलर्टही घोषित करण्यात आले होते. मात्र, अशा स्थितीत हा स्फोट घडल्याने लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com