कर्नाटकात महामार्गालगतची मद्यविक्री जूनपर्यंत चालणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

परवाना नूतनीकरण जूनपर्यंतचा असल्याने तूर्त कारवाई टळणार
बेळगाव - कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्गावरील बार व मद्यविक्रीच्या दुकानांना जूनपर्यंत दिलासा मिळाला आहे. कर्नाटकात जून ते जून असा परवाना नूतनीकरणाचा कालावधी असून, आणखी तीन महिने तरी कारवाई होणार नसल्याचे सूतोवाच उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

राज्यात उत्पादन विभागाकडून परवाना नूतनीकरण जून ते जून या कालावधीत होते. सर्वोच्च न्यायालयानेही आदेश देताना ज्यांचे परवाने 15 डिसेंबरपूर्वी नूतनीकरण झालेले आहेत, त्यांना जूनपर्यंत सवलत दिली जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळे पुढील तीन महिने बेळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बार व मद्यविक्री दुकानांवर कारवाई होणार नसल्याचे चिन्हे आहेत. आणखी दोन महिन्यांत न्यायालयाकडून काही सुधारित आदेश आल्यास ही दुकाने वाचणार आहेत. अन्यथा पुढील दोन महिन्यांत त्यांना महामार्ग सोडून 500 मीटरच्या पुढे मद्यविक्री व बारसाठी जागा शोधावी लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्यांनी डिसेंबर 2015 पूर्वी परवाना नूतनीकरण केलेले आहे, त्यांना जूनपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व दुकानदारांचे परवाने डिसेंबर 2015 पूर्वी नूतनीकरण केलेले आहेत. त्यामुळे या बार व मद्यविक्रीच्या दुकानांवर जूनअखेरपर्यंत कारवाई होणार नाही; परंतु त्यानंतर मात्र त्यांना मद्यपुरवठा होणार नाहीच, शिवाय परवाना नूतनीकरणही होणार नाही.
- अरुणकुमार, उत्पादन शुल्क, जिल्हा उपायुक्त

Web Title: krnataka highway wine sailing june