जोरदार पावसामुळे खडकवासल्यातील विसर्गात वाढ, बाबा भिडे पूल पाण्याखाली

पीटीआय
बुधवार, 3 ऑगस्ट 2016

मंगळवारी आणि बुधवारी पुण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण ९९ टक्के भरले आहे. या धरणातून बुधवारी दुपारी दुपारी २२८०० क्सुसेक वेगाने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे डेक्कन जिमखाना परिसरातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी सोडण्याचे प्रमाण वाढविण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. पाणी सोडण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये मंगळवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच खडकवासला धरणातील पाणी पातळी वाढल्यामुळे बुधवारी दुपारपासून या धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला १८४९० क्सुसेकने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. पण धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वेगही वाढविण्यात आला. गरज पडल्यास आणखी वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले.
टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत १८० मिमी, पानशेतमध्ये २०१ मिमी, वरसगावमध्ये २०५ मिमी तर खडकवासल्यामुळे ७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या चारही धरणांमध्ये मिळून सध्या २०.५४ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्यावर्षी या चारही धरणांमध्ये कमी पाऊस पडल्यामुळे सप्टेंबरपासून पुणे शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. आता धरणांतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत असल्यामुळे पुणे शहराला नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे. काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये महापालिकेत वादावादी झाल्याचे बघायला मिळाले होते.

Web Title: Heavy rain made release of heavy water from Khadakwasala dam

फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी