देशात कोरोना येतोय आटोक्यात, रिकव्हरी रेट वाढला तर मृत्यूच्या आकडेवारीत घट

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 29 September 2020

सप्टेंबर महिन्याच्या मध्यावधीत देशातील कोरोना रुग्णांची प्रतिदिन वाढ 1 लाखाच्या घरात जाऊन पोहचली होती. त्यानंतरच्या आठवड्यात रोज जवळपास 90 हजारांच्या आसपास रुग्ण वाढत होते.

नवी दिल्ली: सप्टेंबर महिन्याच्या मध्यावधीत देशातील कोरोना रुग्णांची प्रतिदिन वाढ 1 लाखाच्या घरात जाऊन पोहचली होती. त्यानंतरच्या आठवड्यात रोज जवळपास 90 हजारांच्या आसपास रुग्ण वाढत होते. यादरम्यान आता एक सकारात्मक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे देशात मागील 30 दिवसांत कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये जवळपास 100 टक्क्यांची वाढ झाली आहे.

देशातील सध्याचा रिकव्हरी रेट 82 टक्क्यांहून अधिक झाला आहे. आतापर्यंत देशात 51 लाखांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. तसेच देशात 10 लाखांपेक्षा कमी कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. हे रुग्ण आतापर्यंत देशात कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांपैकी 20 टक्के आहेत असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे. 

मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 70 हजार 589 नवीन रुग्ण आढळले असून 776 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 2-3 आठवड्यातील कोरोना स्थिती पाहिली तर मागील 24 तासांतील रुग्णांची वाढ आणि मृत्यूंची आकडेवारी दिलासादायक आहे. यावरून देशातील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याचे दिसत आहे. देशात आतापर्यंत 61 लाख 45 हजार 292 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 96 हजार 318 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 51 लाख 1 हजार 398 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

वाचा सविस्तर- केंद्र सरकारने ऑफसेट पॉलिसी रद्द; कॅगच्या अहवालानंतर संरक्षण मंत्रालयाचा निर्णय

देशातील कोरोनाच्या चाचण्यांत सोमवारी अदल्या दिवशीपेक्षा लक्षणीय वाढ दिसून आली. सोमवारी एका दिवशी 11 लाख 42 हजार 811 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामुळे देशात झालेल्या एकून चाचण्यांची संख्या 7 कोटी 31 लाख 10 हजार 41 एवढी झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.  

नड्डांनी वगळलेले चेहरे ‘टीम मोदी’ मध्ये दिसणार?

जरी देशभरात कोरोनाचे रुग्ण कमी आढळत असले तरी काही राज्यातील परिस्थिती अजून चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचा सामावेश आहे. आज अनलॉक 5 मध्ये कोणते निर्बंध कमी केले जातील याची घोषणा होण्याची शक्यता आहे. देशातील अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळण्यासाठी केंद्र सरकार बऱ्याच लहान मोठ्या उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  spread of corona in the country seems to be decreasing