तृणमूलच्या कार्यालयात स्फोट, एक मृत्यूमुखी

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पोलिस घटनास्थळी तपासासठी गेले असता या स्फोटात त्यांना लोखंडाचे बार उडून कार्यालयाच्या बाहेर पडलेले दिसले, तर भिंतींना मोठ्या भेगा पडलेल्या दिसल्या. पोलिस या स्फोटाचा तपास करत असून अद्याप कारण कळले नसल्याचे त्यांनी सांगितले. 

कोलकाता : पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात आज (ता. 23) सकाळी दहाच्या दरम्यान स्फोट झाला असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर या स्फोटात आणखी पाच जण जखमी झाले आहेत, त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पोलिस घटनास्थळी तपासासठी गेले असता या स्फोटात त्यांना लोखंडाचे बार उडून कार्यालयाच्या बाहेर पडलेले दिसले, तर भिंतींना मोठ्या भेगा पडलेल्या दिसल्या. पोलिस या स्फोटाचा तपास करत असून अद्याप कारण कळले नसल्याचे त्यांनी सांगितले. 

कार्यालयात झालेला हा स्फोट क्रूड बॉम्ब किंवा सिलेंडरचा स्फोट असल्याचा संशय घटनास्थळी असलेल्या लोकांनी व्यक्त केला आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार प्रद्युत घोष यांनी 'स्फोटाचे कारण अजून कळू शकले नाही, पोलिस तपास करूत आहेत,' अशी माहिती दिली.   

Web Title: 1 dead and 5 injured in trinamool congress office blast midanapoor west bengal