हैदराबादमध्ये इमारत कोसळून दोन ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

हैदराबाद : बांधकाम सुरू असलेली सात मजली इमारत गुरुवारी रात्री कोसळल्याने दोन जण ठार झाल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. याबाबत आज सकाळी हैदराबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

हैदराबाद : बांधकाम सुरू असलेली सात मजली इमारत गुरुवारी रात्री कोसळल्याने दोन जण ठार झाल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. याबाबत आज सकाळी हैदराबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

शहरातील नानक रामगुंडा परिसरात एका इमारतीचे पेंटिंग आणि अन्य काही काम सुरू होते. इमारतीमध्ये बांधकाम कामगार कुटुंबियांसह राहत होते. दरम्यान आज सकाळी अचानक इमारत कोसळली. त्यामध्ये एकाचा दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका बालकासह अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांना बाहेर काढण्यात आले असून उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शिवाय आणखी किमान 10 ते 12 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी महानगरपालिकेचे अधिकारी, अग्निशामक दलाचे अधिकारी पोचले असून बचावकार्य सुरू आहे.

ज्यावेळी इमारत कोसळली त्यावेळी पाच कुटुंबे इमारतीमध्ये होती अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. सत्यनारायण सिंह नावाच्या व्यक्तीची ही इमारत असून या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात सुरु होते. इमारतीच्या पायाचे पक्के बांधकाम नसल्याने इमारत कोसळल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: 1 dead in Hyderabad building collapse