काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 1 ठार 3 जखमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे असलेल्या मुरान चौकात दहशतवाद्यांनी आज (शुक्रवार) दुपारी पोलिस पथकावर ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये 1 ठार तर 3 जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या एका जवान जखमी झाला आहे. गेल्या आठ दिवसात झालेला हा दुसरा हल्ला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जवानांनी परिसर ताब्यात घेतला आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात शोपिअन जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा झाले होते तर 4 जवान जखमी झाले होते. चार आठवड्यामध्ये दहशतवादी व सुरक्षा रक्षकांमध्ये झालेली ही पाचवी चकमक होती.

Web Title: 1 killed, 3 injured in Jammu & Kashmir after militants attack police party