बंदीपुरमध्ये चकमकीत 1 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

जम्मूजवळील अखनूर सेक्टरमधील जीआरईएफच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी सोमवारी हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील बंदीपूर जिल्ह्यात आज (मंगळवार) पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवाद्यांला ठार मारण्यात यश आले आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदीपूर जिल्ह्यातील पॅरी मोहल्ला हाजीन भागात आज पहाटे झालेल्या चकमकीत दहशतवाद्याला ठार मारण्यात आले. या परिसरात शोधमोहिम सुरु असताना दहशतवाद्याकडून सुरक्षा रक्षकांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दहशतवादी ठार झाला. परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे.

जम्मूजवळील अखनूर सेक्टरमधील जीआरईएफच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी सोमवारी हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. या ह्ल्ल्यानंतर अनेकठिकाणी शोधमोहिम राबविण्यात येत आहे. 

Web Title: 1 terrorist killed in encounter between security forces and terrorists at Bandipora, J&K