"बीएसएफ'चे दहा जवान रेल्वेतून बेपत्ता

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जून 2018

जम्मू-काश्‍मीरमधील सांबा सेक्‍टरला जाणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दहा जवान बेपत्ता झाले आहेत. पश्‍चिम बंगाल अथवा झारखंडमधून ते बुधवारी (ता. 27) लष्कराच्या विशेष रेल्वने प्रवास करीत होते. 

मुघलसराय (उत्तर प्रदेश) - जम्मू-काश्‍मीरमधील सांबा सेक्‍टरला जाणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दहा जवान बेपत्ता झाले आहेत. पश्‍चिम बंगाल अथवा झारखंडमधून ते बुधवारी (ता. 27) लष्कराच्या विशेष रेल्वने प्रवास करीत होते. 

पश्‍चिम बंगालमधील वर्धमान आणि झारखंडमधील धनबाद स्थानकादरम्यान हे जवान रेल्वेतून उतरले असण्याची शक्‍यता त्यांच्याबरोबर असलेल्या "बीएसएफ'च्या अधिकाऱ्यांनी वर्तवली. या रेल्वेतून 83 जवान सांबा सेक्‍टरला जात होते. मुघलसराय स्थानकावर काल रात्री उशिरा गाडी थांबलेली असताना अधिकाऱ्यांनी जवानांची मोजणी केली. त्या वेळी दहा जवान बेपत्ता असल्याचे लक्षात आले. "बीएसएफ' तुकडीच्या कमांडरच्या आदेशानुसार रेल्वे पोलिसांकडे तक्रार केल्याचा माहिती "बीएसएफ'चे उपनिरीक्षक सुखबीर सिंग यांनी दिली. 

Web Title: 10 BSF jawans going to J&K on army special train go missing