चेन्नईत दहा कोटींच्या जुन्या नोटा जप्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

चेन्नई : प्राप्तीकर विभागाने केलेल्या कारवाईत चेन्नईमध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या 10 कोटी रुपये किंमतीच्या नोटा जप्त केल्या आहेत.

चेन्नई : प्राप्तीकर विभागाने केलेल्या कारवाईत चेन्नईमध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या 10 कोटी रुपये किंमतीच्या नोटा जप्त केल्या आहेत.

प्राप्तीकर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका मोठ्या ज्वेलरीच्या शो रूमसह एका घरावर छापा टाकण्यात आला. त्यामध्ये 10 कोटी रुपये आणि काही किलोमध्ये सोने सापडले आहे. "आम्ही 500 आणि 1000 रुपयांच्या 10 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या नोटा जप्त केल्या आहेत', अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना दिली. अधिकारी पुढे म्हणाले, "आम्हाला काही किलोग्रॅम सोन आणि हिऱ्याचे दागिने सापडले आहेत. अद्याप नेमके किती सोने आहे याची खात्री पटलेली नाही. मात्र, ते काही किलोंमध्ये आहे.'

दरम्यान, साताऱ्यात आज पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणाऱ्या तिघांना आज (मंगळवार) सकाळी सातारामधून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 60 लाख रुपयांच्या दोन हजारांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरमधील तिघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी तिरुचिरापल्ली येथून अधिकाऱ्यांना एक हजार रुपयांच्या फाडून टाकलेल्या नोटा एका कचरापेटीत आढळून आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सहाय्याने टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्‍कम सापडत आहे.

Web Title: 10 crore seized from Chennai