Gandhi Jayanti 2020 : महात्मा गांधींच्या 10 दुर्मिळ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

आशिष नारायण कदम
Friday, 2 October 2020

१९५९ मध्ये गांधी मेमोरिअल म्युझियमची स्थापना करण्यात आली. तमिळनाडूतील मदुराईमध्ये उभारण्यात आलेले हे संग्रहालय गांधी संग्रहालय म्हणून ओळखले जाते.

Gandhi Jayanti 2020 : आज महात्मा गांधी यांची १५१वी जयंती जगभरात साजरी केली जात आहे. अहिंसा आणि सत्य याच्या बळावर त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. केवळ भारतातीलच नाही, तर अनेक देशांतील लोकांना त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा दिली. जाती, धर्म, रंग याबाबत होणाऱ्या भेदभावाविरोधात त्यांनी आवाज उठवला.  

राष्ट्रपिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधींविषयीच्या अनेक गोष्टी आजही अनेकांना चकित करतात. गांधीजींच्या आयुष्याबद्दलच्या अशाच दुर्मिळ १० गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील.  

१. जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींशी गांधींचा पत्रव्यवहार

जगभरातील तत्कालीन प्रसिद्ध व्यक्तींशी गांधीजी पत्राद्वारे संवाद साधत होते. तत्वज्ञ लिओ टॉलस्टॉय, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाइन, जर्मनीचा हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलर आणि अभिनेता चार्ली चॅप्लिन यांना गांधीजींनी पाठवलेली पत्रे संग्रहित करून ठेवली आहेत.

हे वाचा - 1948 पूर्वी गांधी हत्येचे झाले पाच प्रयत्न! कागदोपत्री आहे नोंद

२. शांततेच्या नोबेलसाठी नामांकन


तुम्हाला माहित आहे का महात्मा गांधीजींना शांततेच्या नोबेलसाठी किती वेळा नामांकन मिळाले होते? 
१९३७, १९३८, १९३९, १९४७ आणि त्यांच्या हत्येच्या काही दिवस आधी जानेवारी १९४८ मध्ये म्हणजे एकूण पाच वेळा गांधीजींना नामांकन मिळाले होते. 

हे वाचा - गांधी आणि सावरकर : विरोधी प्रवृत्तींचं चिरंतन द्वंद्व

३. ग्रेट ब्रिटननं प्रसिद्ध केलं टपाल तिकीट


भारतावर १५० वर्ष राज्य केलेल्या ब्रिटन सरकारविरोधात गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा दिला. त्याच ब्रिटन सरकारने गांधींच्या मृत्यूनंतर सुमारे २१ वर्षानंतर त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. 

हे वाचा - महात्मा गांधींनी देशाची फाळणी केली का? आक्षेप आणि वास्तव

४. ८ किलोमीटरची अंत्ययात्रा


- ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या करण्यात आली. गांधीजींची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत देशभरातून लोक सहभागी झाले होते. आणि ही अंत्ययात्रा सुमारे ८ किलोमीटर लांबीची होती. 

५. परदेशातही सुरू होत्या चळवळी


- भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तसेच अन्यायाविरुद्ध महात्मा गांधींनी अनेक यात्रा, आंदोलन, चळवळ, सत्याग्रह केले. मात्र, ४ खंडांमधील एकूण १२ देशांमधील नागरी हक्कांच्या चळवळीस जबाबदार होते. 

हे वाचा - अजूनही गांधींवरच राग का?

६. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावेळी गांधींची अनुपस्थिती


जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्य साजरे करण्यासाठी देशाला उद्देशून भाषण करत होते, त्यावेळी गांधीजी तेथे उपस्थित नव्हते. तर त्यावेळी गांधीजी बंगालमध्ये होते. 

७. मदुराई संग्रहालयात आहेत गांधीजींच्या शेवटच्या पाऊलखुणा


१९५९ मध्ये गांधी मेमोरिअल म्युझियमची स्थापना करण्यात आली. तमिळनाडूतील मदुराईमध्ये उभारण्यात आलेले हे संग्रहालय गांधी संग्रहालय म्हणून ओळखले जाते. जेव्हा गांधीजींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली, त्यावेळी रक्ताने माखलेले त्यांचे कपडे आणि इतर वस्तू या संग्रहालयात सुरक्षित जतन करून ठेवल्या आहेत. 

हे वाचा - लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दलच्या माहित नसलेल्या ८ गोष्टी, असा पंतप्रधान होणे नाही

८. गांधीजींनी स्थापन केले ३ फुटबॉल क्लब


डर्बन, प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग येथे फुटबॉल क्लब स्थापन करण्यात गांधीजींचा मोठा वाटा होता. आणि या तिन्ही क्लबला त्यांनी पॅसिव्ह रजिस्टर सॉकर क्लब हे नाव दिले होते. 

९. गांधीजींच्या नावावर आहेत १०१ रस्ते


भारतातील ५३ महत्त्वाचे रस्ते (लहान रस्ते वगळून) आणि भारताबाहेर म्हणजे इतर देशांतील ४८ महत्त्वाच्या रस्त्यांना गांधींचे नाव देण्यात आले आहे. 

१०. आयरिश अॅक्सेंटमध्ये बोलायचे इंग्रजी 


महात्मा गांधी जेव्हा इंग्रजीत संवाद साधायचे त्यावेळी ते आयरिश अॅक्सेंटमध्ये बोलायचे. कारण त्यांच्या आवडत्या शिक्षकांपैकी एक शिक्षक हे आयरिश होते. 

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 facts you probably did not know about Mahatma Gandhi