कालव्यात बस कोसळून 10 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

हैदराबाद - तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात आज (सोमवार) सकाळी प्रवासी बस कालव्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. तर, 18 जण जखमी झाले आहेत.

हैदराबादहून काकीनाडा येथे जात असलेली ही बस खम्मम-हैदराबाद महामार्गावरील कालव्यात कोसळली. नयाकुंगेडमजवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट नागार्जुनसागरच्या कालव्यात कोसळली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र 7 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

बसमधील 18 प्रवासी जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बस कालव्याबाहेर काढण्याचे काम सुरु आहे. 

Web Title: 10 killed as bus falls canal death