Fri, Feb 3, 2023

Corona Update : कोरोनामुळे मरण पावलेल्या पत्रकारांसाठी दहा लाखांची मदत
Published on : 26 December 2022, 6:51 pm
नवी दिल्ली : कोरोनामुळे दगावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत दिली आहे. एकूण ५३ कुटुंबांना याचा लाभ झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही मदत देताना पत्रकारांच्या कर्तव्यदक्ष, धाडसी आणि सामाजिक योगदानाची प्रशंसा केली.
दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. कोरोनाच्या साथीत मरण पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी एकूण पाच कोटी ३० लाख रुपयांची मदत देण्यात आली. गेल्या वर्षी ५० पत्रकारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये अशी मदत देण्यात आली होती.