Naxalites : अनर्थ टळला! छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर सापडली ट्रॅक्टर भरून स्फोटकं; १० जण अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

10 Naxalites arrested on Chhattisgarh telangana border with tractor full explosives recovered

Naxalites : अनर्थ टळला! छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर सापडली ट्रॅक्टर भरून स्फोटकं; १० जण अटकेत

छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर जवानांनी १० नक्षलवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ट्रॅक्टरमध्ये भरलेली स्फोटके देखील जप्त करण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके बड्या माओवाद्यांकडे पाठवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही स्फोटक छत्तीसगड किंवा तेलंगणातील हल्ल्यासाठी वापरले जाणार होते, अशी धक्कादायक माहिती समोर आले आहे. या वर्षातील सर्वात मोठ्या नक्षलवादी हल्ल्याची ही तयारी होती असे सांगितले जात आहे. दरम्यान पकडलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पाच विजापूरचे रहिवासी आहेत. तेलंगणाच्या भद्राडी कोट्टागुडेम पोलिसांनी सीमा भागात कारवाई केली आहे.

तेलंगना पोलीसांनी माहिती दिली की, नक्षलवादी संघटनेचे सदस्य मुलाकानापल्ली आणि दुमुगुडेम मंडल येथे मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा घेऊन लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या आधारे भद्रादी कोत्तागुडेम पोलिसांनी दुमुगुडेम पोलिस आणि सीआरपीएफच्या १४१ व्या बटालियनच्या जवानांचा समावेश असलेली एक टीम तयार केली. यानंतर जवानांनी परिसरातील गावे आणि त्यालगतच्या जंगलात शोधमोहीम सुरू केली. यामध्ये गावाजवळच १० संशयितांना पकडण्यात आले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी सांगितलं की त्यांना एका ट्रॅक्टरसह बोलेरो गाडी, दोन दुचाकींचा समावेश आहे. या वाहनांची झडती घेतली असता स्फोटकांनी भरलेला ट्रॅक्टर सापडला. यामध्ये कार्डेक्स वायरचे सुमारे 90 बंडल, 500 डिटोनेटर आणि इतर स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर सर्वांना अटक करण्यात आली.

चौकशीदरम्यान या आरोपींपैकी पाच नक्षलवादी तेलंगनातील पामेड भागातील तर पाच छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले. सर्व आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून माओवादी संघटनेसाठी काम करत होते.

चौकशीत आणखी खुलासे

पोलिसांच्या चौकशीत अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांनी सांगितले की सगळी स्फोटके माओवादी नेत्यांनी मागवले होते. ते त्यांच्याकडेच घेऊन जात होते. त्याचा वापर हल्ल्यासाठी केला जाणार होता. भद्रादी कोत्तागुडम पोलिसांनी सांगितेले की नक्षलवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांची किंमत लाखोंच्या घरात आहे. मात्र, माओवादी ही स्फोटके कुठून आणत होते, याचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही. आधिकाऱ्यांनी सांगितले की, लवकरच माओवाद्यांची ही पुरवठा साखळीही तोडली जाईल.

या नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली

सममैया (३६) रा. वारंगल

अरेपल्ली श्रीकांत (२३) रा. वारंगल

मेकाला राजू (३६) रा. वारंगळ

रमेश कुम (२८) रा. वारंगल

सल्लापल्ली (२५) रा. वारंगल

मुचाकी रमेश (३२) रा. बिजापूर

सुरेश (25) रा. बिजापूर

बाडसे लालू (२२) रा. बिजापूर

सोडी महेश (20) निवासी- बिजापूर

माडवी चेतू (21) रा. बिजापूर

टॅग्स :Naxalites