पबजी खेळणाऱ्या 10 जणांना राजकोटमध्ये अटक

pubg
pubg

राजकोट - 9 मार्च ते 30 एप्रिल या परिक्षेच्या काळात गुजरातमध्ये पबजी खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने बंदी घातल्यानंतरही काही जण पबजी खेळत आहेत. पबजी खेळून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात अटक केली आहे. 

गुजरातमधील राजकोट आणि सूरत या दोन शहरात पबजी खेळणाऱ्यांवर पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे राजकोटमध्ये या 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

यासंबंधीचे परीपत्रक पोलिसांनी सोशल मीडियावरून जारी केले होते. पोलिसांच्या बंदीनंतरही पबजी खेळणाऱ्यांची संख्या या शहरात कमी झालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com