विषारी दारू पिल्याने 10 जण मृत्युमुखी 

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आणि कानपूर देहात येथे विषारी दारू पिल्याने 10 जण मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्घटनेनंतर दारू दुकानाच्या मालकाला अटक करून दुकानाला सील करण्यात आले आहे. या प्रकरणी अबकारी विभागाच्या काही कर्मचाऱ्यांची बेजबाबदारीसुद्धा पुढे आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून या बेजबाबदार कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची तयारी करण्यात येत आहे. 
 

कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आणि कानपूर देहात येथे विषारी दारू पिल्याने 10 जण मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्घटनेनंतर दारू दुकानाच्या मालकाला अटक करून दुकानाला सील करण्यात आले आहे. या प्रकरणी अबकारी विभागाच्या काही कर्मचाऱ्यांची बेजबाबदारीसुद्धा पुढे आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून या बेजबाबदार कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची तयारी करण्यात येत आहे. 

विषारी दारूप्रकरणी काही जणांना हैलेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या ठेकेदाराकडून दारू आणण्यात आली होती त्याचे नमुने घेऊन त्याचा ठेका बंद केला आहे. त्याचबरोबर क्षेत्रीय अबकारी इन्स्पेक्‍टरला निलंबित करण्यात आले आहे. विषारी दारूमुळेच लोकांचा मृत्यू झाल्याचे अधिकारी अद्याप मान्य करीत नाहीत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मरण पावलेल्या लोकांचे विसेरा न्यायवैद्यक तपासणी करण्यात येत आहे त्याचे रिपोर्टस्‌ अद्याप येणे बाकी असून त्यानंतरच अधिकृतरीत्या काही सांगता येईल. सचेडी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या हेतपुर, सुरार आणि दूल गावासह शेजारील गावातील लोकांनी शुक्रवारी दूल गावातील रामबालक या सरकारी ठेकेदाराकडून दारू खरेदी केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्रीच या लोकांची तब्येत खराब झाली होती. 

Web Title: 10 people have died due to drink poisonous liquor