AtalBihariVajpayee: वाजपेयींबद्दल या 10 गोष्टी माहिती आहेत ? 

AtalBihariVajpayee: वाजपेयींबद्दल या 10 गोष्टी माहिती आहेत ? 

नवी दिल्ली : भारताचे तीनवेळा पंतप्रधान राहिलेले भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आले आहेत. वाजपेयींच्या बाबतीत अनेक अशा गोष्टी आहेत, की ज्या सर्वसामन्यांना ज्ञात नाहीत. त्यांच्या जीवनातील दहा गोष्टींवर जाणून घेणार आहोत. 

वाजपेयींच्या जीवनाशी निगडीत दहा प्रमुख गोष्टी :

1) मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे जन्म झालेल्या वाजपेयी यांचे शिक्षण उत्तर प्रदेशातील कानपूरमधील लक्ष्मीबाई महाविद्यालयातून एमए राज्यशास्त्रात पूर्ण केले.

2) अटलबिहारी यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी हे कवी आणि शिक्षक होते, मानवीमूल्य आणि राष्ट्रप्रेम हे वाजपेयींच्या कवितांमध्ये आले.

3) स्वातंत्र्याच्या काळात छोडो भारत चळवळीच्या माध्यमातून ते राजकारणाशी जोडले गेले. 

4) वाजपेयी यांनी 1939 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) सदस्य म्हणून संघात प्रवेश केला.

5) माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी वाजपेयी यांचे भाषणकौशल्य पाहून ते एकेदिवशी नक्कीच भारताचे पंतप्रधान होतील असे म्हटले होते.

6) वाजपेयींचे वक्तृत्व आणि संघटन कौशल्य हे जनसंघासाठी कायम महत्त्वाचे ठरले.

7) वाजपेयी यांना 1968 मध्ये दीनदयाळ उपाध्याय यांच्यानंतर जनसंघाचे प्रमुख म्हणून काम पाहावे लागले. भारतात आणीबाणीच्या काळात (1975-1977) वाजपेयी आणि जयप्रकाश नारायण कारागृहात राहिले.

8) 1996 मध्ये ते पहिल्यांदा 13 दिवसांसाठी पंतप्रधान झाले, त्यानंतर 19 मार्च 1998 मध्ये 13 महिन्यांसाठी आणि त्यानंतर ते पाच वर्षांसाठी असे भारताचे तीनवेळा पंतप्रधान राहिले.

9) वाजपेयी हे संसदेचे चाळीस वर्षे सदस्य राहिले. लोकसभेत ते दहावेळा, तर राज्यसभेत दोन वेळा खासदार होते.

10) वाजपेयी यांना 2014 मध्ये भारतातील सर्वाच्च भारतरत्न या किताबाने गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com