विमानतळावर पाच मिनिटे टॅक्सी थांबल्यास 100 रुपये दंड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

गोवा : दाबोळी विमानतळावर प्रवाशांना आणणाऱ्या व घेऊन जाणाऱ्या पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांकडून तसेच खासगी वाहनांकडून पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ टॅक्सी थांबविल्यास 100 रुपये दंड आकारण्यात येत असलेल्या प्रकाराला जाब विचारण्यासाठी टॅक्सी चालकांनी  विमानतळावर धडक दिली. 

विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकांना सासंदर्भात जाब विचारण्यास टॅक्सी चालक एकत्र जमले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी विमानतळावर येऊन टॅक्सी चालकांना पाठिंबा देत हे प्रकरण सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये उपस्थित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाच्या परिसरात पार्किंगची कोंडी होऊ नये म्हणून वाहनधारकांना फक्त 5 मिनिटे प्रवाशांना उतरविण्यास किंवा त्यांना घेण्यास दिली आहेत. पाच मिनिटापेक्षा अधिक वेळ झाल्यास 100 रुपये दंडाच्या स्वरुपात रक्कम वसूल केली जात आहे. हे कंत्राट एका खासगी परप्रांतीय ठेकेदाराला देण्यात आले असून त्याची अरेरावी टॅक्सी चालकांना ऐकून घ्यावी लागत आहे.

Web Title: 100 rupees fine if taxi stopped for five minutes at the airport