शंभर रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात !

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जुलै 2018

नवीन शंभर रुपयांच्या नोटेबरोबरच जुन्या शंभर रुपयांच्या नोटादेखील चलनात असणार आहेत. नोटेच्या दोन्ही बाजूंची डिझाईनसुद्धा लॅव्हेंडर रंगातच असणार आहे. नोटेचा आकार 142 मिमी x 66 मिमी इतका असणार आहे.

नवी दिल्ली : शंभर रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात आणण्यात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज (गुरुवार) केली. शंभर रुपयांच्या नव्या नोटा लॅव्हेंडर रंगात असणार आहेत. या नोटांच्या मागील बाजूस गुजरातमधील पाटण येथील सरस्वती नदीच्या काठावरील 'राणी की वाव'चे छायाचित्र असेल.

या नवीन शंभर रुपयांच्या नोटेबरोबरच जुन्या शंभर रुपयांच्या नोटादेखील चलनात असणार आहेत. नोटेच्या दोन्ही बाजूंची डिझाईनसुद्धा लॅव्हेंडर रंगातच असणार आहे. नोटेचा आकार 142 मिमी x 66 मिमी इतका असणार आहे. सध्या चलनात असणाऱ्या शंभर रुपयांच्या नोटेपेक्षा नव्या नोटेचा आकार लहान असणार आहे. 'आरबीआय'ने यापूर्वी 10, 20, 50 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. त्याचबरोबर 200 रुपयांची नोटसुद्धा चलनात आणण्यात आली आहे. त्यानंतर आता शंभर रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार आहेत.

Web Title: 100 rupees new currency soon