SSC RESULT: दहावीनंतर काय करू ? करियर निवडण्यासाठी वाचा ही माहिती

आता दहावीसारखा महत्वाचा टप्पा पार करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पुढे काय ? तेव्हा विद्यार्थी ही माहिती वाचून त्यांच्या शंकांच निरसन करू शकतात.
Are you thinking what to do after 10th? then read this information
Are you thinking what to do after 10th? then read this informationesakal

अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झालाय.(SSC Result) यावेळचा निकाल उत्तम लागला असून महाराष्ट्र राज्याचा निकाल महाराष्ट्राचा ९६.४% एवढा लागलाय.आता दहावीसारखा महत्वाचा टप्पा पार करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पुढे काय ? आपल्या टक्केवारीवरून पुढे कोणतं फिल्ड निवडायचं?तेव्हा विद्यार्थी ही माहिती वाचून त्यांच्या शंकांच निरसन करू शकतात.

दहावीनंतर विद्यार्थ्यांच्या निवडी विज्ञान,कला किंवा वाणिज्य क्षेत्राकडे वळतात.पण त्यासाठी आपल्याला भविष्यात नेमकं काय करायचंय त्यानुसार त्याचा बेस निवडणं गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्हला पुढे जाऊन इंजिनिअरिंग, मेडिकल, आयटी क्षेत्रात काम करायचे असेल तर सायन्स शाखा निवडली पाहिजे. सायन्स शाखेतून आपण मायक्रोबायोलॉजी, ओशिनोग्राफी, बॉटनी असे प्युअर सायन्स करिअरसुद्धा निवडू शकतो.यासोबत बीएससी, एम.एसस्सी करून रिसर्च क्षेत्रातही उत्तमी संधी आहेत.(Carrier After SSC)

विद्यार्थ्यांनी ही माहिती आवर्जून वाचावी

अनेक विद्यार्थ्यांना माहितीच्या अभावी त्यांना हवे असणारे क्षेत्र निवडण्यास अडचणी येतात.म्हणून विद्यार्थ्यांनी ही माहिती आवर्जून वाचावी.

फार्मा करियर (Pharma) : आजकाल फार्मा करियरला मोठी पसंती आहे. सायन्स फिल्डमधून पुढे जाऊन बीफार्मसीद्वारे मेडिसिन क्षेत्रात विद्यार्थी करिअर करू शकतात.फार्मसीचा डिप्लोमाही करता येतो.(Science Field)औषध निर्मिती कंपन्यामध्ये यात उत्तम संधी मिळते.यातच डिफार्म हा सुद्धा एक उत्तम ऑप्शन आहे.. म्हणजे सायन्समधून शिक्षण घेऊन २ वर्षांचं डी फार्म करून आपण स्वतःची फार्मसी टाकू शकतो.

Are you thinking what to do after 10th? then read this information
SSC Result 2022: कमी मार्क पडलेत? पेपर कसा कराल रिचेक?

एम फार्म (M-Pharm): आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे एम फार्म.हे शिक्षण १२ वी नंतर २ वर्षांचं असतं.यात विद्यार्थांनी सायन्स फिल्डमध्ये बायोलॉजी विषय वगळून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स विषय घेतले तरी चालतील.ज्यांनंतर क्लिनिकल रिसर्च, फार्मा को व्हिजिलन्स (बॅकएन्ड), प्री-क्लिनिकल ट्रायल्स अशा अनेक संधी उपलब्ध आहे.

११वी १२ वी सायन्समधून शिक्षण घेऊन एव्हिएशन, फूड सायन्स, फॉरेन्सिक सायन्स, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स , मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, लाइफसायन्स, मॅथेमेटिक्स यात उच्च शिक्षणही घेता येतं.

वाणिज्य (Commerce): कॉमर्स फिल्डमधून अकाउंटिंग, फायनान्समधील बीएएफ, बँकिंग, इन्श्युरन्समधील बीबीआय, फायनान्शिअल मार्केटिंगचे बीएफएम हे करियर ऑप्शन निवडता येतात. यासोबतच बीएएफ, बीबीआय, बीएफएम त्यांनतर सीए, सीएस, एमबीए(MBA,CA) असे प्रोफेशनल कोर्स साठी सुद्धा ११ वि १२ कॉमर्स असं गरजेचं आहे. जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात जायचे असेल तर बीबीआय हा एक बेस्ट ऑप्शन आहे, ज्यात आपण पुढे जाऊन स्पेशलायजेशनही करू शकतो. कॉमर्समध्ये गणिताशिवाय अर्थशास्त्र, टॅक्सेशन, इ-कॉमर्स, बिझनेस लॉ, बिझनेस मॅनेजमेंट, ह्यूमन रिसर्च मॅनेजमेंट अशा करियरच्या वेगवगेळ्या संधी उपलब्ध आहे.

Are you thinking what to do after 10th? then read this information
SSC RESULT: दहावीच्या निकालात मुलींची बाजी, राज्यात कोकण पहिला तर...

वर दिलेली क्षेत्र वगळता विद्यार्थांना जर का काही वेगळं करायचं असेल किंवा गुण कमी पडले असेल तर त्यांनाही कला शाखेमध्ये करियरसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत.तुम्ही इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र , भाषा, भूगोल आणि राज्यशास्त्रमध्ये पदवी घेऊन नागरी सेवा, वित्तीय संस्थांमध्ये अनेक संधी उपलब्ध आहे. तसेच सायकॉलॉजी(Psycology) विषयातून पुढे सायकॉलॉजीस्ट, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट, करिअर कौन्सिलर.(Carrier apportunities)ज्या विद्यार्थ्यांना सायन्स,आर्ट्स किंवा कॉमर्स या तिन्ही विषयात आवड नसेल त्यांच्यासाठी डिफेन्स सारखं क्षेत्र निवडून सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे.दहावीनंतर विद्यार्थी एअरफोर्स, आर्मी, नेव्ही या तीन संरक्षण विभागाची लेखी परीक्षा आणि फिजिकल टेस्ट देऊन भरती होऊ शकतात.(Airforce,Army,) पण महत्वाचं म्हणजे डिफेन्स क्षेत्रात दहावीनंतर लगेचच अधिकारी पदावर जाता येत नाही. अधिकारी पदासाठी पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे.

बऱ्याच जणांना माहिती नसणारं क्षेत्र म्हणजे पॅरामेडिकल.पॅरामेडिकल कोर्स करून (Technology)फिजिओथेरपिस्ट, वेटरनरी सायन्स,, डेअरी टेक्नॉलॉजी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑडिओलॉजी, प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोपेडिक्स, ऑक्टेमेट्रिक अशा क्षेत्रात स्पेशलायझेशन करण्याची उत्तम संधी आहे. याशिवाय दहावीनंतर आयटीआय आणि डिप्लोमा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, म्हणजे  मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, प्रॉडक्शन, कॉम्प्युटर, शेतीशास्त्र, डिझाईनिंग, ऑटोमोबाईल यासारखे बेसिक डिप्लोमा कोर्स करून विद्यार्थ्यांसाठी करिअरचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com